टीम इंडियासाठी कसा असेल सेमी फायनलचा मार्ग? जाणून घ्या सविस्तर

भारतीय संघासमोर एक पेपर बऱ्यापैकी सोपा, पण एक खूपच अवघड

भारतीय महिला संघाने पाकिस्तान महिला संघाला शह देत महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. यासह भारताच्या खात्यात आता २ गुण जमा झाले आहेत.

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवामुळे आता भारतीय संघासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा झाला आहे.

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ 'अ' गटातील ५ संघांपैकी एक आहे. या गटासह 'ब' गटातून आघाडीवर असणारे दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील.

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ 'अ' गटातील ५ संघांपैकी एक आहे. या गटासह 'ब' गटातून आघाडीवर असणारे दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील. पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघासाठी सेमीचा प्रवास कसा असेल, त्यावर एक नजर

पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघासाठी सेमीचा प्रवास कसा असेल, त्यावर एक नजर

भारतीय महिला संघाचा पहिला फोकस हा उर्वरित दोन्ही सामने जिंकण्यावर असेल. यातील एक सामना श्रीलंका आणि दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध नियोजित आहे. हे दोन्ही सामने जिंकून हरमनप्रीत ब्रिगेडला ६ गुणांपर्यंत पोहचता येईल.

भारतीय संघाने उर्वरित दोन सामने जिंकले आणि न्यूझीलंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर भारतीय संघ ६ गुणांसह सेमी फायनल खेळू शकतो. यातही पाकिस्तानच्या संघाने उर्वरित दोन पैकी एकच सामना जिंकला तर भारतीय संघाचा सेमीचा प्रवास सहज सोपा होईल.

भारतासह पाकिस्तानच्या संघानेही आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले आणि न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला मात दिली तर या परिस्थितीत ३ संघाच्या खात्यात ६ गुण होतील. सर्वोत्तम रन रेट असणाऱ्या दोन संघाला सेमीत प्रवेश मिळेल.

भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव पदरी पडला तर या परिस्थितीत भारतीय महिला संघाल अन्य संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

न्यूझीलंडच्या संघाला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी पराभूत केले तर भारतीय संघासह तीन संघाच्या खात्यात प्रत्येकी ४-४ गुण दिसतील. इथं पुन्हा नेट रन रेटच्या माध्यमातून सेमीत कोण खेळणार ते ठरवले जाईल.