Cricket Buzz»फोटो गॅलरी »टीम इंडियासाठी कसा असेल सेमी फायनलचा मार्ग? जाणून घ्या सविस्तरटीम इंडियासाठी कसा असेल सेमी फायनलचा मार्ग? जाणून घ्या सविस्तर By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 1:06 PMOpen in App1 / 11भारतीय महिला संघाने पाकिस्तान महिला संघाला शह देत महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. यासह भारताच्या खात्यात आता २ गुण जमा झाले आहेत. 2 / 11न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवामुळे आता भारतीय संघासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा झाला आहे. 3 / 11महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ 'अ' गटातील ५ संघांपैकी एक आहे. या गटासह 'ब' गटातून आघाडीवर असणारे दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील.4 / 11महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ 'अ' गटातील ५ संघांपैकी एक आहे. या गटासह 'ब' गटातून आघाडीवर असणारे दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील. पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघासाठी सेमीचा प्रवास कसा असेल, त्यावर एक नजर5 / 11पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघासाठी सेमीचा प्रवास कसा असेल, त्यावर एक नजर6 / 117 / 11भारतीय महिला संघाचा पहिला फोकस हा उर्वरित दोन्ही सामने जिंकण्यावर असेल. यातील एक सामना श्रीलंका आणि दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध नियोजित आहे. हे दोन्ही सामने जिंकून हरमनप्रीत ब्रिगेडला ६ गुणांपर्यंत पोहचता येईल.8 / 11भारतीय संघाने उर्वरित दोन सामने जिंकले आणि न्यूझीलंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर भारतीय संघ ६ गुणांसह सेमी फायनल खेळू शकतो. यातही पाकिस्तानच्या संघाने उर्वरित दोन पैकी एकच सामना जिंकला तर भारतीय संघाचा सेमीचा प्रवास सहज सोपा होईल. 9 / 11भारतासह पाकिस्तानच्या संघानेही आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले आणि न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला मात दिली तर या परिस्थितीत ३ संघाच्या खात्यात ६ गुण होतील. सर्वोत्तम रन रेट असणाऱ्या दोन संघाला सेमीत प्रवेश मिळेल.10 / 11भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव पदरी पडला तर या परिस्थितीत भारतीय महिला संघाल अन्य संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.11 / 11न्यूझीलंडच्या संघाला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी पराभूत केले तर भारतीय संघासह तीन संघाच्या खात्यात प्रत्येकी ४-४ गुण दिसतील. इथं पुन्हा नेट रन रेटच्या माध्यमातून सेमीत कोण खेळणार ते ठरवले जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications