Join us  

एवढी सुंदर पत्नी असताना तू 'डिप्रेशन'मध्ये कसा जाऊ शकतोस?; माजी खेळाडूचा विराट कोहलीला सवाल

By स्वदेश घाणेकर | Published: February 27, 2021 12:53 PM

Open in App
1 / 7

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं २०१४च्या इंग्लंड दौऱ्यावर असताना आपणही डिप्रेशनमध्ये गेल्याचं सांगितलं होतं. त्या दौऱ्यावर विराट कोहलीला फार चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि त्याला पाच सामन्यांत १३.४० च्या सरासरीनं १३४ धावा करता आल्या होत्या.

2 / 7

त्या दौऱ्यानंतर विराट नव्या दमानं उभा राहिला आणि आज तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. तरीही त्याच्या डिप्रेशनमध्ये गेल्याच्या दाव्यानं अनेकांना अचंबित केलं. भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर ( former Indian cricketer Farokh Engineer ) यांनी विराट कोहलीच्या त्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

3 / 7

अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) सारखी सुंदर पत्नी असताना तू डिप्रेशनमध्ये कसा जाऊ शकतोस, असा सवाल इंजिनियर यांनी ३२ वर्षीय विराटला केला. स्पोर्ट्सक्रीच्या लाईव्ह सेशनमध्ये त्यांनी हा सवाल केला.

4 / 7

ते पुढे म्हणाले,''पाश्चिमात्य देशात डिप्रेशनच्या अनेक घटना घडतात. ते याबाबत अधिक चर्चाही करता, परंतु मनात काय चाललंय याचा ठाव कुणालाच घेता येत नाही. मन हे भीतीदायक आहे. भारतीयांमध्ये अशा परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती असते. आपणही आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करतो, परंतु आपल्या मानसिक ताकद त्याच्याशी लढते.''

5 / 7

२०१४मध्ये विराटचं लग्न झालं नव्हती, ही बाब इंजिनियर यांच्या ध्यानात आली नसावी, म्हणून त्यांनी हे मत मांडलं. दरम्यान विराट कोहलीनं आपण डिप्रेशनमध्ये गेलो होते, हे सांगितल्यानंतर महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं त्याचं हा अनुभव शेअर केल्याबद्दल कौतुक केलं.

6 / 7

विराट-अनुष्का यांच्या घरी जानेवारी २०२१ मध्ये नन्ही परी आली. विरुष्कानं त्यांच्या मुलीचं नाव वामिका असं ठेवलं आहे. विराटला चिअर करण्यासाठी अनुष्का कन्येसह अहमदाबादला पोहोचली आहे. भारतान तिसरी कसोटी जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

7 / 7

तिसऱ्या कसोटीतील खेळपट्टीवरून फारुख इंजिनियर यांनी टीका केली. ते म्हणाले,''नरेंद्र मोदी स्टेडियम किती सुंदर आहे. मग अशा स्टेडियमवर का चांगली खेळपट्टी तयार केली जात नाही?; फिरकीला पोषक खेळपट्टी असूद्या, घरच्या मैदानाचा यजमानांना फायदा मिळूद्या. पण, दीड दिवसात कसोटी संपणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे.''

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारत विरुद्ध इंग्लंडसचिन तेंडुलकर