Join us  

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली वर्षाला किती कमावतो माहित्येय?

By स्वदेश घाणेकर | Published: November 05, 2020 4:19 PM

Open in App
1 / 10

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आज आपला ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघासोबत UAEत आहे.

2 / 10

यंदाचा बर्थ डे विराटसाठी खूप खास आहे. त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रग्नेंट आहे आणि तिनंही पतीचा बर्थ डे दणक्यात साजरा करण्यासाठी कोणतीच कसर सोडलेली नाही. अनुष्काच्या या सप्राईज पार्टीने विराटही रोमँटिक झाला आणि त्यानं रोमँटिक अंदाजात पत्नीचे आभार मानले.

3 / 10

५ नोव्हेंबर १९८८मध्ये नवी दिल्ली येथे कोहलीचा जन्म झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटनं स्वतःचा ठसा उमटवला आहे.

4 / 10

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद, ८, ९, १० आणि ११ हजार धावा करण्याचा विक्रम, २८ ते ४३ शतकांचा सर्वात जलद प्रवास, कर्णधार म्हणून वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १, २, ३, ४ आणि ५ हजार धावा करणारा फलंदाज, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५, १६, १७, १८, १९, २० आणि २१ हजार धावा करणारा फलंदाज... आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.

5 / 10

त्यानं ८६ कसोटीत ५३.६२ च्या सरासरीनं ७२४० धावा केल्या आहेत. त्यात २७ शतकं व २२ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

6 / 10

वन डे क्रिकेटमध्ये त्यानं २४८ सामन्यांत ५९.३३च्या सरासरीनं ११८६७ धावा केल्या आहेत. ४३ शतकं व ५८ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.

7 / 10

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ८२ सामन्यांत २७९४ धावा त्यानं केल्या आहेत. शिवाय सर्व प्रकारच्या ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ९ हजार धावा करणारा तो भारताचा पहिलाच फलंदाज आहे.

8 / 10

क्रिकेटचं मैदान गाजवणारा विराट मार्केटींग क्षेत्रातही राज्य गाजवतोय. फोर्ब्सनं जाहीर केलेल्या जगातील सर्वात महागड्या १०० खेळाडूंमध्ये एकमेव क्रिकेटपटू हा विराट कोहली आहे.

9 / 10

फोर्ब्सनं जाहीर केलेल्या २०२०मधील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये विराट ६६व्या क्रमांकावर आहे. २०१९च्या तुलनेत त्यानं ३० स्थानांनी सुधारणा केली आहे.

10 / 10

फोर्ब्सच्या माहितीनुसार विराट कोहली या वर्षाला २६ मिलियन डॉलर म्हणजेच १९२ कोटी रुपये कमावतो. यापैकी २४ मिलियन डॉलर ( १७८ कोटी) हे जाहिरातीतून येतात, तर उर्वरित २ मिलियन हे सॅलरी व अन्य बक्षीसांमधून येतात.

टॅग्स :विराट कोहलीIPL 2020बीसीसीआय