इशान किशनची संपत्ती किती अन् वडील काय करतात?, गर्लफ्रेंडही कोट्यधीश! जाणून घ्या...

इशान किशनची सध्या भारतीय क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा आहे. कारण या डावखुऱ्या युवा फलंदाजानं शनिवारी बांगलादेशच्या गोलंदाजांची ज्या पद्धतीनं पिसं काढली ते पाहून सर्वच भारावले आहेत. इशान किशननं बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात द्विशतक झळकावलं. यात २४ चौकार आणि १० खणखणीत षटकारांचा समावेश होता. इशान किशननं अवघ्या १२६ चेंडूत द्विशतक साजरं केलं. सर्वात कमी चेंडूत द्विशतक ठोकणारा खेळाडू ठरला. त्यानं १३१ चेंडूत एकूण २१० धावा केल्या.

इशान किशन एक प्रतिभावान खेळाडू आहे यात काही शंका नाही. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची स्फोटक फलंदाजी पहिल्यांदाच पाहायला मिळाली. इशाननं आयपीएलमध्येही धमाका केला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणारा इशान किशेन गेल्या आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. इशान किशन कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे आणि त्याच्याकडे आलिशान गाड्यांचंही कलेक्शन आहे.

इशान किशन मूळचा बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील असून वयाच्या अगदी कमी वयातच तो कोट्यधीश बनला आहे. इशानच्या द्विशतकी खेळीनंतर त्याच्या गावातही जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार २०२२ सालात किशान किशनचं नेटवर्थ ४५ कोटी रुपये इतकं होतं.

इशान किशन विकेट्कपर बॅट्समन आहे. क्रिकेटमधून मिळणारं मानधन, लीग क्रिकेट करार आणि जाहिरातीतल काम हे इशान किशनच्या कमाईचं साधन आहे. सध्या इशान किशनची ब्रॅँड व्हॅल्यू देखील अधिक आहे. जाहिरातीसाठी इशान किशन कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतो.

इशान किशन याचं वार्षिक उत्पन्न जवळपास ७ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्ससनं इशान किशनवर १५.२५ कोटींची बोली लावत संघात दाखल करुन घेतलं होतं. मुंबई इंडियनस व्यतिरिक्त तो आजवर आयपीएलमध्ये गुजरात लायन्स संघासाठीही खेळला होता. स्थानिक क्रिकेटमध्ये तो झारखंडच्या संघाकडून खेळतो. ६ नोव्हेंबर २०१६ रोजी इशाननं रणजी करंडक स्पर्धेत दिल्ली विरुद्ध २७३ धावांची तुफान खेळी साकारली होती. झारखंडकडून रणजी स्पर्धेत खेळली गेलेली ही आजवरची सर्वात मोठी खेळी आहे.

रिपोर्ट्सनुसार इशान किशनकडे महागड्या गाड्यांचंही कलेक्शन आहे. त्याच्या ताफ्यात BMW 5 Series सारखी आलिशान गाडी आहे. याची किंमत जवळपास ७२ लाख रुपये इतकी आहे. यासोबत त्याच्याकडे ९२ लाख रुपये किमतीची फोर्ड मस्टँग कार देखील आहे. तसंच १.५ कोटी किमतीची मर्सिडिज बेन्झ सी-क्लास कार आहे.

इशान किशननं याशिवाय रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. इशानचे वडील प्रणव कुमार पांडे बिल्डर आहेत. तर आई सुचित्रा पांडे या घर सांभाळतात. धमाकेदार द्विशतकी खेळीनंतर इशान किशनच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. इशाननं आपल्या १० व्याच आंतरराष्ट्रीय वनडेत द्विशतक ठोकण्याचा विक्रम केला आहे.

इशान किशनची कथित गर्लफ्रेंड अदिती हुंडिया देखील चर्चेचा विषय ठरत आहे. ती मॉडल असून म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातीतून तिही चांगली कमाई करते. ती २०१७ साली मिस इंडिया स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली होती. तर २०१८ साली तिनं मिस सुपरनॅशनल इंडियाचा किताब पटकावला होता.

अदिती हुंडिया मॉडलिंग आणि जाहिरातीतून कमाई करतेच पण ती सोशल मीडिया स्टार देखील आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. मीडिया रिपोर्टनुसार तिची एकूण संपत्ती २ ते ३ मिलियन डॉलर इतकी आहे. ती मुंबईत वास्तव्याला असून तिच्याकडेही आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे.