१२ कोटींपेक्षा अधिक पगारासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला मिळणार 'या' सुविधा

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याची भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी ही माहिती दिली.

गंभीरच्या नावावर फार पूर्वीच एकमत झाले होते, पण गंभीरला पगाराचा प्रश्न भेडसावत आहे आणि त्यामुळेच घोषणा व्हायला वेळ लागत होत. मात्र एकमत होऊन गंभीरच्या नावाची घोषणा झाल्याचे दिसत आहे.

मात्र आता भारताचा नवी प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरला किती पगार मिळेल, त्याचा कार्यकाळ किती असेल आणि त्याला कोणत्या सुविधा मिळतील? जाणून घेऊया याबद्दल...

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक, राहुल द्रविड यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर गौतम गंभीर पुढील प्रशिक्षक म्हणून टीम इंडियासोबत साडेतीन वर्षे घालवणार आहे.

या कालावधीत आयसीसी स्पर्धा, आशिया चषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसह देशांतर्गत आणि परदेशी दौऱ्यांवर संघाच्या यशाची जबाबदारी गौतम गंभीरवर असेल.

पगाराबद्दल बोलायचे झाले तर बीसीसीआयकडून माजी प्रशिक्षक राहुल द्रविडला वार्षिक १२ कोटी रुपये मानधन मिळायचे. मात्र गंभीरला त्याहूनही अधिक पगार दिला जाईल असं म्हटलं जात आहे.

बीसीसीआय नियमांनुसार, ज्या वेळेस भारतीय संघ परदेश दौऱ्यावर असतो तेव्हा प्रशिक्षकला दररोज २५० अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार २१ हजार रुपये दिले जातात.

पगारासोबतच बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकांना अनेक सुविधाही पुरवते. कोणत्याही टूरसाठी मुख्य प्रशिक्षकाला बिझनेस क्लासमध्ये प्रवास करण्याची सुविधा मिळते. तसेच उत्तम हॉटेल्समध्ये राहण्याची सोय देखील केली जाते.

गौतम गंभीरची संपत्ती - २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, गौतम गंभीरची एकूण संपत्ती १४७ कोटी रुपये आहे. तर त्याच्यावर ३५ कोटींचे कर्ज देखील आहे.