Cricket Buzz»फोटो गॅलरी »१२ कोटींपेक्षा अधिक पगारासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला मिळणार 'या' सुविधा१२ कोटींपेक्षा अधिक पगारासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला मिळणार 'या' सुविधा By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 1:21 PMOpen in App1 / 8गंभीरच्या नावावर फार पूर्वीच एकमत झाले होते, पण गंभीरला पगाराचा प्रश्न भेडसावत आहे आणि त्यामुळेच घोषणा व्हायला वेळ लागत होत. मात्र एकमत होऊन गंभीरच्या नावाची घोषणा झाल्याचे दिसत आहे.2 / 8मात्र आता भारताचा नवी प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरला किती पगार मिळेल, त्याचा कार्यकाळ किती असेल आणि त्याला कोणत्या सुविधा मिळतील? जाणून घेऊया याबद्दल...3 / 8भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक, राहुल द्रविड यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर गौतम गंभीर पुढील प्रशिक्षक म्हणून टीम इंडियासोबत साडेतीन वर्षे घालवणार आहे.4 / 8या कालावधीत आयसीसी स्पर्धा, आशिया चषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसह देशांतर्गत आणि परदेशी दौऱ्यांवर संघाच्या यशाची जबाबदारी गौतम गंभीरवर असेल.5 / 8पगाराबद्दल बोलायचे झाले तर बीसीसीआयकडून माजी प्रशिक्षक राहुल द्रविडला वार्षिक १२ कोटी रुपये मानधन मिळायचे. मात्र गंभीरला त्याहूनही अधिक पगार दिला जाईल असं म्हटलं जात आहे.6 / 8बीसीसीआय नियमांनुसार, ज्या वेळेस भारतीय संघ परदेश दौऱ्यावर असतो तेव्हा प्रशिक्षकला दररोज २५० अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार २१ हजार रुपये दिले जातात. 7 / 8पगारासोबतच बीसीसीआय मुख्य प्रशिक्षकांना अनेक सुविधाही पुरवते. कोणत्याही टूरसाठी मुख्य प्रशिक्षकाला बिझनेस क्लासमध्ये प्रवास करण्याची सुविधा मिळते. तसेच उत्तम हॉटेल्समध्ये राहण्याची सोय देखील केली जाते.8 / 8गौतम गंभीरची संपत्ती - २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, गौतम गंभीरची एकूण संपत्ती १४७ कोटी रुपये आहे. तर त्याच्यावर ३५ कोटींचे कर्ज देखील आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications