फ्रंट पेजवर एकच नाव!; जगानेही घेतली टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाची दखल, तुम्हालाही अभिमान वाटेल

India vs Australia : टीम इंडियानं मिळवलेल्या गॅबा कसोटीतील अशक्यप्राय विजयावर जगाला अजूनही विश्वास बसला नसेल कदाचित. अनेक संकटांचा सामना करताना अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि टीमनं ऑस्ट्रेलियावर २-१ असा मालिका विजय मिळवला आणि तोही त्यांच्याच घरच्या मैदानावर... टीम इंडियाच्या या विजयाची दखल जगभरातील प्रमुख वर्तमानपत्रांनी घेतली.

२०१८-१९ मध्ये विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियानं ७१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती २०२०-२१ च्या मलिकेत अजिंक्यनं करून दाखवली.

ब्रिस्बेन कसोटीत टीम इंडियानं ३ विकेट्स राखून विजय मिळवत मालिका खिशात घातली आणि या विजयानं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचेही डोळे पाणावले. ड्रेसिंग रुममध्ये त्यांनी खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केलं.

रिषभ पंतनं विजयी चौकार मारल्यानंतर शास्त्रीही इमोशनल झाले. गॅबावर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणाऱ्या भारतीय संघाला पाहून डोळ्यांत पाणी दाटून आल्याचे, शास्त्रींनी सांगितले.

३६ ऑल आऊट ते ऐतिहासिक मालिका विजय, यासाठी भारतीय खेळाडूंनी जो धाडस आणि दृढनिश्चय दाखवला, त्याचे शास्त्री गुरूजींनी कौतुक केले. ते म्हणाले,''तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी आणलंत.. जे धाडस, जो निश्चय आणि जिंकण्याची वृत्ती तुम्ही दाखवतील, ते काल्पनिक आहे, याची तुम्हालाही जाण आहे. दुखापत होऊनही तुम्ही लढलात.. ३६ धावांवर ऑल आऊट झाल्यानंतरही तुम्ही स्वतःवरील विश्वास कायम ठेवलात.''