Sir Ravindra Jadeja name story: रविंद्र जाडेजाला 'सर' का म्हणतात? सुपरस्टार Rajinikanth अन् CSKच्या MS Dhoni शी आहे खास कनेक्शन

जड्डूला कधीपासून फॅन्स 'सर जाडेजा' म्हणू लागले.. जाणून घ्या

Sir Ravindra Jadeja Name Story: श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीत रविंद्र जाडेजाने धडाकेबाज कामगिरी केली. सध्याच्या घडीला सर्वोत्तम ऑलराऊंडर्समध्ये त्याची गणना केली जाते. रविंद्र जाडेजाला बरेचदा सर जाडेजा म्हटलं जातं. यामागे नक्की काय कारण आहे.. जाणून घेऊया. (Superstar Rajinikanth, MS Dhoni)

जाडेजाचे भारतीय संघातील सहाकारी असोत, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघातील सहकारी असो किंवा सोशल मीडियावरील चाहते असोत... बहुतेक जण त्याचा उल्लेख सर जाडेजा असाच करतात. इतकंच नव्हे तर एखाद्या क्रिकेटच्या कार्यक्रमातही त्याला सर जाडेजा म्हटलं जातं. हे खरं तर महेंद्रसिंग धोनीमुळे पडलं आहे हे खूर कमी जणांना माहिती असेल.

२०१३ साली IPL सुरू असताना भारतीय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा ट्वीटरवर प्रचंड अँक्टिव्ह असायचा. त्यावेळी त्याने काही मजेशीर ट्वीट्स केली होती. त्यानंतर जाडेजाला लोकं सर म्हणून लागले. ती ट्वीट्स नक्की काय होती ते पाहूया.

सुरूवातीला धोनीने एक ट्वीट केलं होतं. त्यात लिहिलं होतं, 'सर जाडेजा कधीही कॅच पकडायला धावत नाही, चेंडू आपोआप त्याला शोधत शोधत येतो आणि त्याच्या हातामध्ये विसावतो.'

धोनी एकच ट्वीट करून थांबला नाही. त्याने आणखी दोन ट्वीट केली. त्यातील एक ट्वीटमध्ये लिहिलं होतं, 'जेव्हा सर जाडेजा जीप ड्राईव्ह करत असतो तेव्हा जीप एकाच जागेवर असतो रस्ता आपोआप हलू लागतो. तो जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा पूर्ण पॅव्हेलियन पिचच्या दिशेनं चालू लागतं.'

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचा उल्लेख करूत धोनीने दुसरं ट्वीट केलं होतं. 'देवाला समजलं होतं की रजनीकांत सर यांचं आता वय झालंय त्यामुळे त्याने सर रविंद्र जाडेजा बनवला.' धोनीच्या अशा ट्वीट्समुळे जाडेजाला लोक 'सर' म्हणून लागले आणि अजूनही म्हणत असतात.