Join us  

'भारतातील लोकं माझा जीव घेतील'; असं का म्हणतेय जेमिमा रॉड्रिग्ज अन् त्याचा MS Dhoniशी काय संबंध?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 3:29 PM

Open in App
1 / 7

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज सध्या The Hundred Women’s स्पर्धेत खेळत आहे. तिनं नॉर्दन सुपरचार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना ५ सामन्यांत २४१ धावा केल्या आहेत आणि ती स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.

2 / 7

मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी केल्यानंतर जेमिमानं मंगळवारी दी हंड्रेडच्या समालोचक टीममध्येही पदार्पण केलं. तिनं मँचेस्टर ओरिजिनल्स आणि लंडन स्पीरिट संघातील सामन्यादरम्यान समालोचन केलं. या दरम्यान तिला काही मजेशीर प्रश्नही विचारण्यात आले.

3 / 7

तिला यावेळी तिचा आवडता यष्टिरक्षक कोण? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर जेमिमानं ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट याचे नाव घेतले, परंतु तिनं लगेच उत्तर बदलले अन् महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतले. त्यानंतर ती लगेच हसू लागली.

4 / 7

जेमिमा म्हणाली,''अ‍ॅडम गिलख्रिस्ट हा माझा आवडता यष्टिरक्षक आहे. माफ करा महेंद्रसिंग धोनीपण, भारतातील लोकं आता माझा जीव घेतील.'' ( Jemima said, “My favorite wicketkeeper is Adam Gilchrist. Excuse me MS Dhoni too. People will kill me in India.”)

5 / 7

महेंद्रसिंग धोनीनं जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यानंही अ‍ॅडम गिलख्रिस्ट हा आदर्श असल्याचे सांगितले होते. गिलख्रिस्टमुळे आपल्याला यष्टिरक्षक बनण्याची प्रेरणा मिळाली, असे तो म्हणाला होता.

6 / 7

दी हंड्रेड लीगमध्ये २००+ धावा करणारी जेमिमा ही एकमेव खेळाडू आहे. तिनं ६०पेक्षा अधिक सरासरीनं धावा करताना ३ अर्धशतकं झळकावली आहेत.

7 / 7

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App