Join us  

PHOTOS: हुस्न की मलिका! इशान या तरुणीच्या प्रेमात किशन कन्हैया झाला, गर्लफ्रेंडची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 3:15 PM

Open in App
1 / 7

टीम इंडियाचे क्रिकेटर आणि नट्या, मॉडेल्स यांचे खूप जवळचे नाते आहे. आज अनेक जोड्या पाहिल्यात तर ते सिद्धही होते. आता काहींचे हार्दिक पांड्यासारखेही होते. काहींचे लग्नाआधीच ब्रेकअपही होते. परंतू, तरीही या जोड्या चर्चेत असतात. आता इशान किशन आणि त्याची सौंदर्याची राणी असलेली गर्लफ्रेंड यांची चर्चा आहे.

2 / 7

इशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया ही पेशाने मॉडेल आहे. यामुळे ती तिच्या स्टायलिश लुकमुळे चर्चेत असते. ती इन्स्टावर तिचा सौदर्याने अनेकांना घायाळ करते. तिच्या याच ग्लॅमरवर आपला ईशान क्लिन बोल्ड झाला आहे.

3 / 7

इशान किशन अनेकदा मॉडेल अदिती हुंडियासोबतच्या फोटोंमध्ये दिसतो. ती इशानची गर्लफ्रेंड असल्याचा दावा अनेक बातम्यांमध्ये करण्यात आला आहे.

4 / 7

काही वर्षांपूर्वी आदितीचे इशानसोबतचे फोटो तिच्या वाढदिवशी व्हायरल झाले होते. ती आयपीएलमध्ये इशानला चिअर्स करताना देखील दिसली आहे. यावरूनच सारे समजून गेले आहेत.

5 / 7

ती मॉडेलिंग आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून चांगली कमाई करते. तिची एकूण संपत्ती 2 ते 3 दशलक्ष डॉलर्स दरम्यान असल्याचे सांगितले जाते. तर इशान किशनच्या कार कलेक्शनमध्ये फोर्ड मस्टँग, बीएमडब्ल्यू 5 सीरीज आणि मर्सिडीज बेंझ सी-क्लास सारख्या आलिशान कार आहेत.

6 / 7

आदितीने इंडिया इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले आहे. ती मॉडेलिंग करते.

7 / 7

दोघांनी अद्याप त्यांच्या अफेअरची माहिती सार्वजनिक केलेली नसली तरी एकमेकांसोबतचे रोमँटीक फोटो, एकमेकांसाठीच्या पोस्ट आदी पाहता नक्कीच काहीतरी सुरु असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :इशान किशन