Join us

इब्राहिम झाद्रान ते सौरव गांगुली! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या उभारणारे ५ फलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 21:05 IST

Open in App
1 / 8

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या हंगामात अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झाद्रान याने ऐतिहासिक खेळी केली.

2 / 8

लाहोरच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली.

3 / 8

सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येसह चॅम्पियन्स ट्रॉफीत 'दादागिरी' करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या यादीत सौरव गांगुलीचाही समावेश आहे. एक नजर यासंदर्भातील खास रेकॉर्डवर

4 / 8

अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झाद्रान याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात १४६ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १७७ धावांची दमदार खेळी केली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरलीये.

5 / 8

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडच्या बेन डकेटचा नंबर लागतो. याच हंगामात त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात १४३ चेंडूत १६५ धावा ठोकल्या होत्या. त्याच्या खेळीत १७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

6 / 8

न्यूझीलंडचा नेथन ॲस्टल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत युएसए संघाविरुद्ध त्याने १५१ चेंडूत १३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १४५ धावांची खेळी केली होती.

7 / 8

झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर याने २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध १६४ चेंडूत १३ चौकाराच्या मदतीने १४५ धावांची खेळी केली होती. तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

8 / 8

भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेटच्या मैदानात दादा या नावाने ओळखला जाणारा सौरव गांगुलीही आघाडीच्या ५ फलंदाजांमध्ये आहे. गांगुलीनं २००० मध्ये रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४२ चेंडूत नाबाद १४१ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने ११ चौकारांसह ६ षटकार मारले होते.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५सौरभ गांगुली