ICC Awards 2021, Full list of nominees revealed : ना विराट, ना रोहित... ICC पुरस्कार नामांकनात स्मृती मानधनाचा बोलबाला, पाकिस्तानच्या खेळाडूंचा दिसतोय दबदबा

ICC Awards 2021: Full list of nominees revealed : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) शुक्रवारी २०२१ वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली.

वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिली जाणारी Sir Garfield Sobers Trophyसाठी जाहीर करण्यात आलेल्या चार नावांमध्ये दोन खेळाडू पाकिस्तानचे आहेत. भारताच्या एकाही पुरुष क्रिकेटपटूला या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले नाही. पण, सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या Rachael Heyhoe Flint Trophy साठी भारताची सलामीवीर स्मृती मानधना ( Smriti Mandhana ) हिला नामांकन दिलं गेलं आहे.

सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या नामांकनात पाकिस्तानचा शाहिन शाह आफ्रिदी व मोहम्मद रिझवान यांचा समावेश आहे. त्यांना इंग्लंडचा कर्णधार जो रूट व न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांची टक्कर मिळणार आहे. जो रूटनं २०२१मध्ये १८ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ५८.३७च्या सरासरीनं १८५५ धावा केल्या आहेत आणि त्यात ६ शतकांचा समावेश आहे. शाहिन आफ्रिदीनं ३६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ७८ विकेट्स घेतल्या आहेत आणि ६ बाद ५१ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मोहम्मद रिझवाननं यंदाचं वर्ष गाजवलंय. त्यानं ४४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ५६.३२च्या सरासरीनं १९१५ धावा केल्या आहेत. त्यात २ शतकांचा समावेश आहे आणि यष्टिंमागे त्यानं ५६ बळी टिपले आहेत. केन विलियम्सननं १६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत १ शतकासह ४३.३१च्या सरासरीनं ६९३ धावा केल्या आहेत.

सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या Rachael Heyhoe Flint Trophy साठी इंग्लंडची टॅमी बीयूमोंट, दक्षइण आफ्रिकेची लिझली ली, भारताची स्मृती मानधना आणि आयर्लंडचा गॅबी लूईस या चौघी षर्यतीत आहेत. टॅमीनं २०२१मध्ये २१ आंतरराष्ट्रीय सामन्यात ४८.४४ सरासरीनं ८७२ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व ८ अर्धशतकांचा समावेश आहे. लिझली ली हिनं १९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ५७.६च्या सरासरीनं ८६४ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ७ अर्धशतकांचा समावेश आहे. गॅबी लुईसनं १५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत १ शतक व चार अर्धशतकांसह ५२च्या सरासरीनं ६२४ धावा केल्या आहेत. स्मृती मानधनानं २२ सामन्यांत ८५५ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ५ अर्धशतकं आहेत.

ICC Men’s ODI Cricketer of the Year - शाकिब अल हसन, बाबर आजम, जानेमन मलान, पॉल स्टीर्लिंग

ICC Women’s ODI Cricketer of the Year - टॅमी बीयूमोंट, लिझली ली, हॅली मॅथ्यू, फातिमा साना

ICC Men’s T20I Cricketer of the Year - जोस बटलर, वनिंद हसरंगा, मिचेल मार्श, मोहम्मद रिझवान

ICC Women’s T20I Cricketer of the Year - टॅमी बीयूमोंट, गॅबी लुईस, स्मृती मानधना, नॅट शिव्हर

ICC Women’s T20I Cricketer of the Year - टॅमी बीयूमोंट, गॅबी लुईस, स्मृती मानधना, नॅट शिव्हर

पुरस्कार विजेत्यांची घोषणा २३ व २४ जानेवारी २०२२ मध्ये करण्यात येणार आहेत .