Join us  

OMG : World Cup Super League गुणतक्त्यात टीम इंडियाच्या नावे भोपळा; झिम्बाब्वे, आयर्लंड टॉप फाईव्हमध्ये

By स्वदेश घाणेकर | Published: November 28, 2020 12:18 PM

Open in App
1 / 10

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग स्पर्धेमुळे कोणताही संघ आता वन डे मालिकेला हलक्यात लेखण्याची चूक करणार नाही.

2 / 10

२०२३ला होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळायचे असेल तर World Cup Super League च्या गुणतालिकेत संघाना आपापले स्थान बळकट करावे लागणार आहे आणि प्रत्येक संघ त्याच प्रयत्नात दिसत आहे.

3 / 10

याच गुणतक्त्यात टीम इंडिया सहाव्या स्थानी आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वे आणि आयर्लंड हे कमकुवत संघ टीम इंडियाच्या पुढे आहेत. ऑस्ट्रेलियानं शुक्रवारी विजयाची नोंद करून या गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

4 / 10

इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात गतवर्षी झालेल्या वन डे मालिकेतून World Cup Super League ला सुरुवात झाली. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड चार, तर आयर्लंडनं एका गुणाची कमाई केली.

5 / 10

आतापर्यंत World Cup Super League नुसार सहा संघांमध्ये मालिका झाली आहे. पाकिस्तान व झिम्बाब्वे हे अन्य दोन संघ आहेत.

6 / 10

ऑस्ट्रेलियानं ३७४ धावांचा डोंगर उभा करून टीम इंडियाला ३०८ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले आणि ६६ धावांनी विजय मिळवला.

7 / 10

अॅरोन फिंच (११४) व स्टीव्हन स्मिथ ( १०५) यांची शतकी खेळी, डेव्हिड वॉर्नरचे ( ६९) अर्धशतक आणि ग्लेन मॅक्सवेलच्या ( ४५) फटकेबाजीच्या जोरावर ऑसींनी ही धावसंख्या उभारली. भारताकडून शिखर धवन ( ७४) आणि हार्दिक पांड्या ( ९०) वगळता अन्य फलंदाजांना अपयश आलं.

8 / 10

अॅडम झम्पानं ५४ धावांत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. हेझलवूडनं ५३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ५० षटकांत ८ बाद ३०८ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियानं हा सामना ६६ धावांनी जिंकला.

9 / 10

World Cup Super Leagueमध्ये इंग्लंडनं सहापैकी तीन सामने गमावूनही अव्वल स्थान कायम राखले आहे. इंग्लंडचा नेट रनरेट हा +०.७९० आहे आणि त्यामुळे समान गुण असूनही ऑस्ट्रेलिया ( +०.३३०) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

10 / 10

दरम्यान, टीम इंडियाला या गुणतक्त्यातील क्रमवारीचा फार फरक पडणार नाही. २०२३चा वर्ल्ड कप भारतात होणार असल्यानं यजमान म्हणून टीम इंडियानं आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे World Cup Super League च्या गुणतक्त्यातील अव्वल सात संघ २०२३च्या वर्ल्ड कप साठी पात्र ठरणार आहेत.

टॅग्स :आयसीसीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाइंग्लंडझिम्बाब्वेआयर्लंडपाकिस्तान