Join us  

ICC Men's T20I team of the year 2021: आयसीसीच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात एकही भारतीय नाही; बाबर आजमला बनवले कर्णधार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 4:24 PM

Open in App
1 / 13

ICC Men's T20I team of the year 2021: आयसीसीनं बुधवारी २०२१ वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघ जाहीर केला. त्यांच्या या संघात एकाही भारतीयाला स्थान पटकावता आलेले नाही. विशेष म्हणजे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्याकडे या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आयसीसीच्या या संघात पाकिस्तानच्या सर्वाधिक तीन खेळाडूंनी, तर ऑस्ट्रेलियाच्या दोन व इंग्लंडच्या एका खेळाडूनं स्थान पटकावले आहे.

2 / 13

जॉस बटलर ( इंग्लंड) - इंग्लंडच्या या फलंदाजानं या वर्षाय १४ सामन्यांत ६५.४४ च्या सरासरीनं ५८९ धावा कुटल्या. त्यात एका शतकाचा समावेश आहे. त्यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही इंग्लंडकडून सर्वाधिक २६९ धावा केल्या. त्यात श्रीलंकेविरुद्धच्या शतकाचा समावेश आहे.

3 / 13

मोहम्मद रिझवान - यष्टिरक्षक ( पाकिस्तान) -पाकिस्तानच्या या यष्टिरक्षक-फलंदाजानं २०२१ हे वर्ष गाजवलं. त्यानं २९ सामन्यांत ७३.६६च्या सरासरीनं १३२६ धावा केल्या. यष्टिंमागेही त्यानं कमाल दाखवली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

4 / 13

बाबर आजम - कर्णधार ( पाकिस्तान) -पाकिस्तानच्या या कर्णधारानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला. त्यानं २०२१मध्ये २९ सामन्यांत ९३९ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व ९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

5 / 13

एडन मार्कराम ( दक्षिण आफ्रिका) - २०२१मध्ये एडन मार्करामनं १८ सामन्यांत ४३.८४च्या सरासरीनं ५७० धावा केल्या. त्यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं गोलंदाजीतही ५ विकेट्स घेतल्या.

6 / 13

मिचेल मार्श ( ऑस्ट्रेलिया) - मार्शनं २०२१मध्ये २१ सामन्यांत ६२७ धावा व ८ विकेट्स घेतल्या.

7 / 13

डेव्हिड मिलर ( दक्षिण आफ्रिका) - १७ सामन्यांत ३७७ धावा.

8 / 13

वनिंदू हसरंगा ( श्रीलंका) - २० सामन्यांत ३६ विकेट्स आणि १९६ धावा. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं सर्वाधिक १६ विकेट्स घेतल्या.

9 / 13

तब्रेझ शम्सी ( दक्षिण आफ्रिका) - जागतिक क्रमवारीत नंबर वन गोलंदाज असलेल्या शम्सीनं २२ सामन्यांत ३६ विकेट्स घेतल्या

10 / 13

जोश हेझलवूड ( ऑस्ट्रेलिया) - १५ सामन्यांत २३ विकेट्स

11 / 13

मुस्ताफिजूर रहमान ( बांगलादेश) - २० सामन्यांत २८ विकेट्स

12 / 13

शाहिन आफ्रिदी ( पाकिस्तान) - २१ सामन्यांत २३ विकेट्स

13 / 13

ICC men's T20I team of the year 2021: जोस बटलर, मोहम्मद रिझवान, बाबर आजम, एडन मार्कराम, मिचेल मार्श, डेव्हिड मिलर, तब्रेझ शम्सी, जोश हेझलवूड, वनिंदू हसरंगा, मुस्ताफिजूर रहमान, शाहिन आफ्रिदी

टॅग्स :आयसीसीबाबर आजमटी-20 क्रिकेट
Open in App