Cricket Buzz»फोटो गॅलरी »ICC ODI Ranking : भारतीय संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण, माहितीये पहिल्या क्रमांकावर कोणती टीम आहे?ICC ODI Ranking : भारतीय संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण, माहितीये पहिल्या क्रमांकावर कोणती टीम आहे? By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 7:00 PMOpen in App1 / 7भारतीय क्रिकेट संघाची आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. भारतीय संघाची मात्र यात घसरण झाली.2 / 7पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आलाय. तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी गेलीये. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये कमी गुणांचं अंतर आहे.3 / 7वार्षिक अपडेटनंतर ऑस्ट्रेलियाचे रेटिंग पॉईंट्स ११३ वरून ११८ झाले झालेत. तर पाकिस्तानचे रेटिंग पॉईंट्स ११६ आणि भारताचे रेटिंग पॉईंट्स ११५ झालेत. पाकिस्तान आणि भारतीय संघातही १ पॉईंटचं अंतर आहे.4 / 7वार्षिक अपडेट पूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ ११३ पॉईंट्ससह टॉपवर होता. तर भारतीय संघ दुसऱ्या आणि पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. वार्षिक अपडेटनंतर पाकिस्तान तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. 5 / 7चौथी वनडे जिंकून पाकिस्तान पहिल्या क्रमांकाचा एकदिवसीय क्रिकेट संघ बनला होता. परंतु पाकिस्ताननं अखेरचा सामना गमावला आणि आयसीसी रँकिंगमधलं पहिलं स्थानही त्यांना गमवावं लागलं. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत क्लिन स्विप केल्यानंतर पाकिस्तानला पहिल्या क्रमांकावर राहणं शक्य होतं.6 / 7यंदा आयसीसी विश्वचषकाचं आयोजन भारतात होणार आहे, अशा परिस्थितीत आगामी काळात अनेक एकदिवसीय मालिका पाहायला मिळतील. त्यामुळे भारताकडे पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर जाण्याची मोठी संधी उपलब्ध आहे.7 / 7आयसीसीच्या या यादीत न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर गेला आहे. तर अफगाणिस्तानचा संघही मोठी उडी घेत आठव्या स्थानी आलाय. तर श्रीलंका आणि वेस्ट इंडिज अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकाचा संघ सातव्या आणि बांगलादेश सातव्या क्रमांकावर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications