Join us  

‘बार बार दिन ये आये…’, वाढदिवशी ‘विराट’ शतक, सचिनच्या विश्वविक्रमाच्या बरोबरीसह अनेक पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 6:11 PM

Open in App
1 / 7

रोहित शर्मा ( ४०), श्रेयस अय्यर ( ७७), शुबमन गिल ( २३), सूर्यकुमार यादव ( २२) व रवींद्र जडेजा ( २९*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ५ बाद ३२६ धावांचा डोंगर उभा केला.

2 / 7

रोहित शर्माने ( ४० धावा, २४ चेंडू) ज्या प्रकारे सुरुवात केली होती, ती पाहता भारत आज ३५०-४०० धावा बनवेल असे वाटले. पण, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ११ ते २५ षटकांत चांगला मारा केली. विराट कोहली व श्रेयस अय्यर खेळपट्टीवर असूनही त्यांना धावांचा वेग फार काही वाढवता आलेला नव्हता. मात्र, सेट झालेल्या जोडीने नंतर आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोप दिला.

3 / 7

विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३००० धावा आज पूर्ण केल्या आणि सचिननंतर ( ३७५२) हा टप्पा ओलांडणारा तो दुसरा भारतीय ठरला. शिवाय विराटने भारतात वन डे क्रिकेटमधील ६००० धावांचा टप्पाही ओलांडला आणि सचिननंतर असा पराक्रम करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.

4 / 7

दोघांच्या १३४ धावांच्या भागीदारीने भारताला कमबॅक करून दिले. श्रेयस ८७ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ७७ धावांवर बाद झाला. लोकेश राहुल ( ८) व सूर्यकुमार यादव ( २२) माघारी परतले. विराटने ११९ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले.

5 / 7

या वर्ल्ड कपमध्ये ५०० धावा पूर्ण करणारा तो पहिला आशियाई फलंदाज ठरला. पण, सचिन तेंडुलकर ( २ वेळा) आणि रोहित शर्मा यांच्यानंतर एकाच वर्ल्ड कपमध्ये हा टप्पा ओलांडणारा तिसरा भारतीय ठरला. घरच्या मैदानावरील विराटचे हे ३७वे शतक ठरले आणि त्याने रिकी पाँटिंगचा ( ३६ ) विक्रम मोडला. या विक्रमात सचिन तेंडुलकर ४२ शतकांसह आघाडीवर आहे.

6 / 7

१४ वर्षांपूर्वी जिथून हा प्रवास सुरू झाला होता तिथेच विराटने हे ऐतिहासिक शतक झळकावले. विराटने २७७ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला, तर सचिनने ४५२ इनिंग्ज खेळल्या. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या विक्रमात विराट, सचिननंतर रोहित शर्मा ३१ ( २५१ इनिंग्ज), रिकी पाँटिग ३० ( ३६५ इनिंग्ज) आणि सनथ जयसूर्या २८ ( ४३३ इनिंग्ज) यांचा क्रमांक येतो.

7 / 7

३५व्या वाढदिवशी शतक झळकावून विराटने आणखी एक पराक्रम केला. वाढदिवसाला वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट हा जगातील सातवा आणि तिसरा भारतीय ठरला. १९९३ मध्ये विनोद कांबळीने नाबाद १०० ( वि. इंग्लंड), सचिन तेंडुलकर १३४ ( वि. ऑस्ट्रेलिया, १९९८), सनथ जयसूर्या १३० ( वि. भारत, २००८), रॉस टेलर नाबाद १३१ ( वि. पाकिस्तान, २०११), टॉम लॅथम १४० ( वि. नेदरलँड्स, २०२२), मिचेल मार्श १२१ ( वि. पाकिस्तान, २०२३) यांनी हा पराक्रम केला आहे. यापैकी टेलर, मार्श व विराट यांनी वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावले आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीसचिन तेंडुलकरभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका