Join us  

भारताला १९८२च्या पराक्रमाच्या पुनरावृत्तीची संधी, अफगाणिस्तानने उभी केलीय विक्रमांची 'दही हंडी'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 6:30 PM

Open in App
1 / 6

हशमतुल्लाह शाहिदी हा वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानकडून ८० धावा करणारा पहिला कर्णधार ठरला. अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये एकाच डावात दोन ५०+ धावा चौथ्यांदा झाल्या आहेत. शाहिदीने ८० आणि अझमतुल्लाह ओमारझाईने ६२ धावा केल्या.

2 / 6

अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कप स्पर्धेत हशमतुल्लाह शाहिदीने सर्वाधिक ३ वेळा ५०+ धावा केल्या आहेत. नजिबुल्लाह झाद्रान आणि समीउल्लाह शिनवारी यांनी प्रत्येकी २ वेळा अशी कामगिरी केलीय. वर्ल्ड कप स्पर्धेत शाहिदीची ८० धावांची खेळी ही अफगाणिस्तानकडून एखाद्या फलंदाजाने केलेली तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.

3 / 6

अफगाणिस्तानची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१९मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध लीड्स येथे २८८ धावा केल्या होत्या. आज अफगाणिस्तानने २०१९मध्ये इंग्लंडविरुद्धचा ८ बाद २४७ धावांचा विक्रम मोडला.

4 / 6

नवी दिल्लीच्या स्टेडियमवर १९८२ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध २७८ धावांचे यशस्वी लक्ष्य पार केले होते आणि ही सर्वोत्तम कामगिरी होती. ही कामगिरी वगळता २४०+ धावांच्या लक्ष्याचा इथे एकदाच यशस्वी पाठलाग झाला आहे. १९९६च्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेने भारताविरुद्ध २७२ धावांचे लक्ष्य पार केले होते.

5 / 6

दिल्लीच्या मैदानावर २०१३नंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ सहापैकी पाच सामने जिंकला आहेत. भारताने मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना ७ विकेट्स राखून मॅच जिंकली होती.

6 / 6

मोहम्मद सिराज हा आजच्या सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज ठरला त्याने ९ षटकांत एकही विकेट न घेता ७६ धावा दिल्या. यापूर्वी २०१९मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात १० षटकांत ७६ धावा दिल्या होत्या.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तानभारतमोहम्मद सिराज