Join us  

कुणी झाडावर बसलंय, तर...! क्रिकेट मॅच पाहण्यासाठी तुडूंब गर्दी; UAEच्या फलंदाजाने झळकावले वन डे इतिहासातील वेगवान शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 2:08 PM

Open in App
1 / 7

नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती ( Nepal vs UAE) यांच्यातल्या वन डे सामन्याला तुडूंब गर्दी जमलेली पाहायला मिळाली.

2 / 7

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठीच्या लीग २ मधील हा सामना पाहण्यासाठी नेपाळचे स्टेडियम खचाखच भरले होते. काही चाहते तर चक्क झाडावर बसून या वन डे सामन्याची मजा घेताना दिसले.

3 / 7

सोशल मीडियावर या स्टेडियमला प्रेक्षकांचा लाभलेल्या प्रतिसादाचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत आणि त्यात एरियर फोटो तर अनेक क्रिकेट तज्ज्ञांना चक्रावून टाकणारा आहे.

4 / 7

नेपाळसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी हा सामना जिंकल्यास ते थेट वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरतील आणि त्यानंतर मुख्य स्पर्धेसाठी त्यांची शर्यत सुरू होईल.

5 / 7

UAEने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३१० धावांचा डोंगर उभारला आहे. वृत्या अरविंदने ९४ आणि आसिफ खानने नाबाद १०१ धावांची खेळी केली.

6 / 7

आसीफने ४२ चेंडूंत ४ चौकार व ११ षटकार खेचून शतक पूर्ण केले. वन डे क्रिकेट इतिहासातील संलग्न संघटनेच्या खेळाडूने झळकावलेले हे सर्वात वेगवान शतक ठरले आहे.

7 / 7

नेपाळने ४४ षटकांत ६ बाद २६९ धावा केल्या आणि अंधुक प्रकाषामुळे सामना थांबवला गेला. DLS नुसार नेपाळला विजयी घोषित केले गेले आणि त्यांनी वर्ल्ड कप पात्रता फेरीत प्रवेश केला.

टॅग्स :आयसीसीनेपाळसंयुक्त अरब अमिराती
Open in App