Join us  

इतरांच्या हाती पाकिस्तानचं नशीब! बाबर आजम अँड टीमला उपांत्य फेरीची अजूनही संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 10:24 AM

Open in App
1 / 8

या विजयासह आफ्रिकेने १० गुणांसह उपांत्य फेरीच्या दिशेने झेप घेतली. नेदरलँड्सविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिकन संघ दुसऱ्या पराभवाकडे वाटचाल करत होता. पण, केशव महाराजाच्या चौकाराने संघाला विजय मिळवून दिला.

2 / 8

शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद वसीम ज्युनियर या पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या तळाच्या फळीला हादरा दिला. चेपॉकच्या खेळपट्टीवर २७० धावा पुरेशा ठरणाऱ्या नव्हत्या, परंतु पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सामना ४८व्या षटकापर्यंत खेचला.

3 / 8

उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी पाकिस्तानला विजय आवश्यक होता. मात्र या पराभवानंतरही पाकिस्तान टॉप ४ च्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. पाकिस्तानचे भवितव्य आता त्यांच्या हातात नाही आणि त्यांना इतर संघांच्या विजयावर अवलंबून राहावे लागेल.

4 / 8

पाकिस्तानचा उर्वरित तीन सामन्यांत बांगलादेश ( ३१ ऑक्टोबर), न्यूझीलंड ( ४ नोव्हेंबर) आणि इंग्लंड ( ११ नोव्हेंबर) यांचा मुकाबला करायचा आहे. त्यांना नेट रन रेट सुधारण्यासाठी हे सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. भारताने आता न्यूझीलंडला पराभूत करावे अशी प्रार्थना पाकिस्तानला करावी लागेल.

5 / 8

पाकिस्तानला त्यासाठी उर्वरित ३ सामने जिंकावे लागतील आणि तेव्हा त्यांची गुणसंख्या १० होईल. त्याचवेळी न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव त्यांना अपेक्षित आहे. न्यूझीलंड संघाने आपले उर्वरित सर्व सामने गमावले, तर पाकिस्तानला संधी आहे.

6 / 8

४ नोव्हेंबरला पाकिस्तानला न्यूझीलंडचा पराभव करावा लागणार आहे. यानंतर न्यूझीलंडचे केवळ ८ गुण असतील आणि पाकिस्तानचे १० गुणांसह लीग संपेल. दोन्ही संघांमध्ये गुणांची बरोबरी झाल्यास नेट रन रेट निर्णायक ठरेल.

7 / 8

पाकिस्तानसाठी दुसरी शक्यता म्हणजे ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश व अफगाणिस्तानकडून पराभव व्हायला हवा. ऑस्ट्रेलियाने पुढील ४ पैकी ३ सामने गमावले तर पाकिस्तानला त्याचा फायदा होईल. ऑस्ट्रेलियाचे ८, तर पाकिस्तानचे १० गुण होतील. ऑस्ट्रेलियाने पुढील ४ पैकी २ सामने गमावले तर पाकिस्तानला नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागेल.

8 / 8

पाकिस्तान अजूनही स्पर्धेत टिकून आहेत आणि त्यांना सातत्यपूर्ण कामगिरीसह इतरांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी आपापले स्थान जवळपास पक्के केले आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानद. आफ्रिकान्यूझीलंडआॅस्ट्रेलिया