Join us  

IPLमध्ये ज्यांच्यावर झाला कोट्यवधींचा वर्षाव, त्यांना ऑस्ट्रेलियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात मिळाले नाही स्थान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 11:47 AM

Open in App
1 / 7

ऑस्ट्रेलियानं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाची गुरुवारी घोषणा केली. अ‍ॅरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे अनुभवी खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पहिले जेतेपद पटकावून देण्यात प्रयत्नशील असतील. पण, इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोट्यवधींची कमाई करणाऱ्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान मिळालेले नाही.

2 / 7

जलदगती गोलंदाज झाय रिचर्डसन याच्यासाठी पंजाब किंग्सनं १४ कोटी रुपये मोजले. त्यानं वेस्ट इंडिज व बांगलादेश दौऱ्यावरून माघार घेतली होती आणि त्यामुळेच त्याला वर्ल्ड कप संघात स्थान पटकावता आले नाही.

3 / 7

आणखी एक जलदगती गोलंदाज राईली मेरेडिथ याच्यासाठी पंजाब किंग्सनं ८ कोटी रुपये मोजले. त्यानं याच वर्षी ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणही केलं होतं, परंतु वर्ल्ड कपसाठी त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही.

4 / 7

नॅथन कोल्टर नाइल या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूलाही वर्ल्ड कप साठीच्या संघात स्थान पटकावता आले नाही. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सनं ५ कोटी मोजले होते. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत तो ऑस्ट्रेलियाच्या संघाचा सदस्य होता.

5 / 7

पंजाब किंग्सनं ४.२० कोटींत ताफ्यात दाखल करून घेतलेल्या मोईजेस हेन्रीक्सलाही ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान पटकावता आलेले नाही. बांगलादेश व वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो खेळला, परंतु त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.

6 / 7

स्फोटक सलामीवीर ख्रिस लिन याच्याकडेही दुलर्क्ष केल गेले आहे. मुंबई इंडियन्सनं त्याला २ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले, परंतु त्याला फार कमी खेळण्याची संधी मिळाली.

7 / 7

अँड्य्रू टाय हाही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नाही. त्याला राजस्थान रॉयल्सनं १ कोटींत ताफ्यात घेतले.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१आॅस्ट्रेलियाआयपीएल २०२१
Open in App