संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा सलग दोन सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ सगळ्यांच्या निशाण्यावर आहे. या पराभवाबाबत फॅन्सकडून वेगवेगळे तर्क दिले जात आहेत. असाच एक तर्क हा काही तरुणींचा फोटो फोटो व्हायरल करून दिला जात आहे.
सोशल मीडियावर अशा काही पोस्ट व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंडच्या सपोर्टमध्ये असलेल्या काही तरुणींचा फोटो शेअर केला गेला मात्र यामागील सत्य वेगळेच आहे.
न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामध्ये मॉडेल केंडल जेनर, जीजी हदीद दिसत आहेत. दोघींनी ब्लॅक ड्रेस घातला आहे. तो ड्रेस न्यूझीलंडच्या ड्रेसशी मिळताजुळता आहे. अनेक पेज, ट्विटरवर भारतीय संघाच्या पराभवाचे हेच नेमके कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा ट्रोलिंगचाच एक भाग आहे.
मात्र केंडल जेनर, जीजी हदीद यांचे फोटो खूप जुने आहेत. त्याचे भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी-२० विश्वचषकामध्ये झालेल्या लढतीशी काही देणे घेणे नाही आहे. हा फोटो २०१५ मधील आहे. दोन्ही स्टार्स एक फ्रेंड फुटबॉल सामना पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा तेव्हाचा फोटो कायम व्हायरल होत असतो. असेच भारत आणि न्यूझीलंडदरम्यान झालेल्या लढतीतही झाले.
हा सामना भारताने गमावला. मात्र त्याचे मुख्य कारण खराब खेळ हे होते. त्यानंतर सोशल मीडियावर फॅन्स अनेक प्रकारची कारणे पराभवासाठी देत आहेत. तसेच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत आहेत.
टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाने आतापर्यंत आपले दोन्ही सामने गमावले आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला १० विकेट्सनी नमवले होते. त्यानंतर न्यूझीलंडनेही भारतावर आठ विकेट्सनी मात केली होती. आता भारताचे सामने अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंड यांच्याशी होणार आहेत.