आजच्या सामन्यात शाहिन शाह आफ्रिदी ( १-२१), इमाद वासीम ( १- २४) आणि मोहम्मद हाफिज ( १-१६) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रौफनं २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडला ८ बाद १३४ धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून डॅरील मिचेल ( २७), केन विलियम्सन ( २५), डेव्हॉन कॉनवे ( २७) यांची झुंज दाखवली.
बाबार आजम व मोहम्मद रिझवान ही जोडी आज अपयशी ठरली, परंतु शोएब मलिकनं ( Shoaib Malik) आणि आसिफ अली यांनी पाकिस्तानची नौका पार केली. पाकिस्तानला अखेरच्या १८ चेंडूंत २४ धावांची गरज होती. १८व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर शोएबनं १२ धावा चोपल्या. मलिक २० चेंडूंत २७, तर आसिफ १२ चेंडूंत २७ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं १८.४ षटकांत ५ बाद १३५ धावा करून विजय पक्का केला.
पाकिस्ताननं आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलं आहे. आता दुसऱ्या संघासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात थेट लढत असेल. त्यामुळे ३१ तारखेचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भारतानं हा सामना जिंकल्यास त्यांना उर्वरित लढतीत अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबिया यांना नमवून ८ गुणांसह सेमीफायनलचं गणित गाठता येईल
भारताविरुद्ध जर न्यूझीलंडनं विजय मिळवला, तर टीम इंडियाला उर्वरित तीनही सामने जिंकून काहीच उपयोग होणार नाही. अफगाणिस्ताननं काही पराक्रम केला, तर कदाचित संधी मिळू शकते.
या सर्व समिकरणात अफगाणिस्ताननं काही उलटफेर केला नाही तर या तीन संघांपैकी दोन उपांत्य फेरीचे प्रबळ दावेदार आहेत.
ग्रुप २ मध्ये पाकिस्तान ४ गुण व ०.७३८ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहेत. अफगाणिस्तान १ विजयासह २ गुण व ६.५०० नेट रन रेटनं दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता अफगाणिस्तानचा सामना पाकिस्तान, न्यूझीलंड, भारत, नामिबिया यांच्याशी आहे आणि यात त्यांनी धक्कादायक निकाल नोंदवल्यास भारत व न्यूझीलंड यांना धक्का बसू शकतो.