संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकामध्ये आता भारतीय संघाचं भवितव्य न्यूझीलंडचा पराभव आणि नेट रनरेटवर येऊन अडकलं आहे. आज आपण जाणून घेऊयात महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये संघांचे समान गुण झाल्यावर महत्त्वाच्या ठरणाऱ्या नेट रनरेटविषयी आणि तो कसा काढला जातो याविषयी.
आयसीसी टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत प्रवेश करणारे तीन संघ निश्चित झाले आहेत. एका गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या गटातून पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र या गटात उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि भारतामध्ये चुरस आहे.
क्रिकेटमध्ये आयसीसीची मोठी स्पर्धा किंवा अधिक संघांचा सहभाग असलेली स्पर्धा होते तेव्हा नेट रन रेट हा चर्चेत असतो. आता सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकातही नेट रनरेट खूप चर्चेत आहे.
हा नेट रनरेट कुठल्याही सामन्यात खेळलेल्या संघाच्या दोन्ही डावांवरून काढला जातो. म्हणजेच फलंदाजी करताना डावात किती षटके खेळली, किती धावा केल्या आणि गोलंदाजी करताना किती षटकांमध्ये किती धावा गमावल्या, या आधारावरून हा नेट रनरेट काढला जातो. तेव्हा पहिल्या डावातून दुसऱ्या डावाची सरासरी वजा केली जाते आणि नेट रनरेट काढला जातो.
नेट रनरेट काढण्याचा फॉर्म्युला पुढीलप्रमाणे आहे. एकूण बनवलेल्या धावा/एकूण खेळलेली षटके-एकूण गमावलेल्या धावा/एकूण फेकलेली षटके=नेट रनरेट
उदाहरण द्यायचे झाल्यास कुठल्याही संघाने फलंदाजी करताना २० षटकांमध्ये १२० धावा जमवल्या, तर त्याचा रनरेट ६ एवढा असतो. मात्र गोलंदाजी करतानाच या संघाने सर्व धावा गमावल्या, तर रन रेट ८ एवढा होतो. अशा परिस्थितीत नेट रनरेट -२.००० वर पोहोचतो. मात्र जर कुठल्याही संघाने २० षटकांमध्ये १०० धावा दिल्यास तर त्यांचा नेट रनरेट +१.००० होतो.
हा कुठल्याही एका संघाचा नेट रनरेट झाला. मात्र जेव्हा दोन्ही संघांचा नेट रनरेट काढला जातो. तेव्हा हरलेल्या संघाचा नेट रनरेट हा जिंकलेल्या संघांमधून घटवला पाहिजे. जिंकलेल्या संघाचा नेट रनरेट ५ आला आणि हरलेल्या टीमचा नेट रनरेट ४ आला असेल तर जिंकलेला संघ +१.००० आणि हरलेल्या संघाचा -१.००० एवढा राहील.
हा कुठल्याही सामन्यामध्ये नेट रन-रेट काढण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे नेट रनरेटमध्ये विकेट्स पडल्याने कुठलाही फरक पडत नाही. तसेच कुठल्याही संघाने संपूर्ण षटके खेलली नाहीत, तर त्यांची तेवढीच षटके मोजली जातात.
मात्र जर प्रथम फलंदाजी करणारा संघ संपूर्ण षटके खेळला. मात्र दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ कमी धावात बाद झाला तर त्यांना नेट रनरेटमध्ये पूर्ण षटके खेळल्याचा फायदा मिळू शकतो. तसेच संपूर्ण स्पर्धेमध्ये नेट रनरेट हा वाढत, किंवा कमी होत जातो. कुठल्याही संघाने जर एका समान्यात चांगला खेळ केला आणि दुसऱ्या सामन्यात खराब खेळ केला तर त्यांच्या स्पर्धेतील नेट रनरेटवर फरक पडतो.