बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलचे 31 सामने न झाल्यास बीसीसीआयला 2500 कोटींचा फटका बसणार आहे आणि त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
बीसीसीआयचा हाच हट्ट ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनात खोडा घालणारा ठरणार आहे आणि त्यासाठी बीसीसीआय प्रतिष्ठेच्या वर्ल्ड कप स्पर्धा आयोजनावरही पाणी सोडण्यासाठी तयार आहे.
आयपीएल 2021साठी बीसीसीआयनं तयार केलेला बायो बबल कोरोनानं भेदला अन् एकामागून एक खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे बीसीसीआयनं ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआयनं यूएईची निवड केली आणि अमिराती क्रिकेट बोर्डाशी बोलणीही सुरू केली आहे.
आयसीसीच्या नियामनुसार कोणत्याही स्पर्धेच्या आयोजनाच्या 15 दिवसांपूर्वी तेथील स्टेडियम ताब्यात घेतले जातात. त्यामुळे जर आयसीसीला ट्वेंटी-20 वर्ल्ड खेळवायचा असेल तर त्यांना 1 ऑक्टोबरला स्टेडियम्सचा ताबा घ्यावा लागेल.
आयसीसीच्या नियामनुसार कोणत्याही स्पर्धेच्या आयोजनाच्या 15 दिवसांपूर्वी तेथील स्टेडियम ताब्यात घेतले जातात. त्यामुळे जर आयसीसीला ट्वेंटी-20 वर्ल्ड खेळवायचा असेल तर त्यांना 1 ऑक्टोबरला स्टेडियम्सचा ताबा घ्यावा लागेल.
आयपीएल 2021च्या नव्या तारखांनुसार 15 ऑक्टोबरला फायनल होईल आणि त्यानंतर आयसीसीला स्टेडियम ताब्यात मिळतील आणि मग पुढील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा वेळापत्रकांवर त्याचा परिणाम जाणवेल. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आयसीसी विचार करत आहेत.
त्यावर पर्याय म्हणून बीसीसीआयनं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे विचारणा सुरू केली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अजूनही भारताला प्रथम प्राधान्य आहे. पण, कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
स्टँडबाय म्हणून यूएईचा पर्याय समोर होता आणि त्यात श्रीलंकेचा पर्याय समोर आला आहे. आयपीएल आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनात किमान 15 दिवसांचा गॅप आवश्यक आहे. त्यासाठी बीसीसीआयला आयपीएल 10 ऑक्टोबरपर्यंत संपवावी लागेल.
आयपीएल 2021ला वाचवण्यासाठी बीसीसीआयचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आयोजनात खोडा घातला जाईल ने पक्कं दिसतंय. To save the IPL 2021, BCCI is talking to Sri Lanka Cricket if it could host ICC T20 World Cup matches