ICC ची खास फ्रेम अन् काव्या मारन यांच्या SRH साठी आनंदी आनंद गडे सीन!

IPL आधी सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यासाठी ICC च्या फ्रेममध्ये दिसला खास सीन

आयपीएल स्पर्धेआधी अभिषेक शर्मानं टीम इंडियाकडून विक्रमी खेळी केली. त्याची ही खेळी हैदराबादच्या मालकीण बाई काव्या मारन यांच्यासाठी एकदम खासच आहे. कारण अभिषेक शर्मा हा आयपीएलमध्ये हैदराबादच्या ताफ्यातून खेळताना दिसतो.

त्यात आयसीसीच्या नव्या टी क्रमावारीतील खास फ्रेममुळे काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील आनंद अधिक द्विगुणित केलाय.

आयसीसी टी-२० क्रमवारीत ८२३ रेटिंग पॉइंटसह अभिषेक शर्मा हा दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.

या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅविस हेड ८५५ रेटिंगसह अव्वलस्थानावर आहे.

हे दोन्ही बॅटर आगामी आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून खेळताना दिसणार आहेत.

आयपीएल २०२५ च्या हंगामाआधी सनरायझर्स हैदराबादची ही जोडी नंबर वन आणि नंबर २ असल्यामुळे काव्या मारन यांच्यासाठी हा सीन एकदम खास असेल.

सनरायझर्स हैदराबाद संघाची चर्चा होते त्यावेळी संघाच्या मालकीण बाई काव्या मारन या प्रकाशझोतात येतात. या जोडीमुळे हा चेहरा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सध्याच्या घडीला दिवार चित्रपटातील बिग बींचा 'आज खुश तो बहुत होंगे तुम' हा डायलॉग काव्या मारन यांच्यासाठी एकदम परफेक्ट शोभणार आहे.