Women’s T20 World Cup स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या ३ भारतीय 'रन'रागिनी

इथं एक नजर टाकुयात महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या ३ बॅटरवर...

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ४ ऑक्टोबरपासून महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

भारतीय महिला संघ पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. कॅप्टन हरमनप्रीत कौरवर त्याची मोठी जबाबदारी असेल.

कॅप्टन हरमनप्रीतशिवाय भारताची सलामीची बॅटर स्मृती मानधना हिच्याकडूनही मोठ्या अपेक्षा असतील. इथं एक नजर टाकुयात महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या ३ बॅटरवर...

भारताची सलामीची स्फोटक बॅटर स्मृती मानधना टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय बॅटरच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्मृती मानधना हिने आतापर्यंत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २१ सामने खेळले असून यात तिच्या खात्यात २२.४७ च्या सरासरीसह ४४९ धावांची नोंद आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची विद्यमान कर्णधार हरमनप्रीत कौर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने आतापर्यंत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ३५ सामने खेळले आहेत. यात तिच्या खात्यात २०.५७ च्या सरासरीसह ५७६ धावा जमा आहेत.

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज या यादीत सर्वात आघाडीवर आहे.

मिताली राज हिने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २४ सामने खेळताना ४०.३३ च्यासरासरीनं ७७६ धावा केल्या आहेत. यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे.