ICC Women's T20 World Cup : भारतीय ताफ्यात कुणाला किती सामन्यांचा अनुभव? इथं पाहा रेकॉर्ड

महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय ताफा सज्ज, एक नजर संघातील खेळाडूंच्या रेकॉर्ड्सवर

हरमनप्रीत कौर ही महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. १७३ टी-२०I सामन्यातील १५३ डावात तिने ३४२६ धावा केल्या आहेत. यात एका शतकासह १२ अर्धशतकांचा समावेश आहे.

स्मृती मानधना भारतीय संघाची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने १४१ टी-२०I सामन्यातील १३५ डावात ३४९३ धावा केल्या आहेत. तिच्या खात्यात २६ अर्धशतकांची नोंद आहे.

शफाली वर्मा ही भारताच्या डावाची सुरुवात करते. तिने ८१ टी-२०I सामन्यातील ८० डावात १० अर्धशतकासह १९४८ धावा केल्या आहेत.

दीप्ती शर्मा भारतीय महिला संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. तिच्या नावे ११७ टी-२०I सामन्यात २ अर्धशतकासह १०२० धावा आहेत. याशिवाय ११७ सामन्यातील ११४ डावात तिने १३१ विकेट्स घेतल्या आहेत. १० धावांत ४ विकेट्स ही तिची आंतरराष्ट्रीय टी-२० मधील गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

जेमिमा रॉड्रिग्ज ही देखील भारताची एक अनुभवी बॅटर आहे. तिने भारताकडून १०० कसोटी सामने खेळले आहेत. ११ अर्धशतकासह तिच्या खात्यात २०७४ धावा जमा आहेत.

रिचा घोष ही भारताची विकेट किपर बॅटर आहे. आतंरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५५ सामने खेळले आहेत. यात तिच्या खात्यात ८६० धावा जमा आहेत. विकेट मागे तिने २६ झेलसह आणि २४ जणींना यष्टिचित केले आहे.

यश्तिका भाटिया हिला महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाच्या ताफ्यातील दुसऱ्या विकेट किपर बॅटरच्या रुपात संधी मिळाली आहे. १९ सामन्यातील १४ डावात तिने २१४ धावा केल्या आहेत. विकेटमागच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर तिने ५ झेलसह ८ जणींना यष्टिचित केले आहे.

पूजा वस्त्राकर ही भारतीय महिला संघातील गोलंदाजी युनिटची ताकद आहे. ७० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात तिच्या खात्यात ५७ धावा जमा आहेत.

अरुंधती रेड्डी उजव्या हाताने मध्यम जलगती गोलंदाजी करते. तिने २९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात २१ विकेट्स घेतल्या आहेत.

रेणुका सिंग ठाकूर हिने भारताकडून ४७ टी-२० सामन्यात ५० विकेट्स घेतल्या आहेत.

दयालन हेमलता फिरकीपटू आणि टॉप ऑर्डर बॅटरच्या खात्यात २३ टी-२०I सामन्यात २७६ धावांसह ९ विकेट्स जमा आहेत.

सोभाना आशा ही अष्टपैलू खेळाडूच्या रुपात भारतीय महिला क्रिकेट संघात खेळते. ३३ वर्षीय महिला खेळाडूनं चेहऱ्यानं फक्त ३ टी-२० I सामने खेळले आहेत. यात तिच्या खात्यात ४ विकेट्स जमा आहेत.

राधा यादव ही भारतीय संघातील फिरकीची जादू दाखवून देणारी छोरी आहे. ८० आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात तिने ९० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

श्रेयंका पाटील हिच्या खात्यात १२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १६ विकेट्स जमा आहेत. बॅटिंग करण्याचीही तिच्यात क्षमता आहे.