Cricket Buzz»फोटो गॅलरी »ICC World Cup 2019 : 'हे' आहेत दुसऱ्या आठवड्यातील टॉप XIICC World Cup 2019 : 'हे' आहेत दुसऱ्या आठवड्यातील टॉप XI By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 2:47 PMOpen in App1 / 12वर्ल्ड कप स्पर्धेचा दुसरा आठवडा पाण्यातचं गेला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण, काही सामने असे झालेत की त्यात विक्रमी खेळीही झाल्या. आज आपण वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या आठवड्यातील कामगिरीच्या जोरावर अंतिम 11 खेळाडून पाहणार आहोत.2 / 12जेसन रॉय - इंग्लंडच्या या सलामीवीरानं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 153 धावांची खेळी केली. त्यात 14 चौकार व 5 षटकार खेचले.3 / 12शिखर धवन - भारताच्या सलामीवीराने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्यानं 109 चेंडूंत 16 चौकारांसह 117 धावा चोपल्या.4 / 12डेव्हिड वॉर्नर - पाकिस्तानविरुद्धच्या शतकी खेळीनं ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीराला संजीवनी दिली. वॉर्नरने 107 धावा केल्या.5 / 12शकिब अल हसन - जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूनं इंग्लंडच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. त्याची 121 धावांची खेळी बांगलादेशला विजय मिळवून देऊ शकली नाही.6 / 12जोस बटलर - बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या या खेळाडूनं 44 चेंडूंत 64 धावांची उपयुक्त खेळी केली.7 / 12अॅलेक्स करी - वेस्ट इंडिज आणि भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या यष्टिरक्षकाने महत्त्वाचे योगदान दिले. विंडीजविरुद्ध त्यानं 55 चेंडूंत 45 धावा केल्या, तर भारताविरुद्ध 35 चेंडूंत 55 धावा चोपल्या.8 / 12जेम्स नीशॅम - न्यूझीलंडच्या या गोलंदाजाने अफगाणिस्तानचा निम्मा संघ माघारी पाठवून रिचर्ड हॅडली यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. 9 / 12जेसन होल्डर - वेस्ट इंडिजचा कर्णधाराने गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही आपलं योगदान दिलं. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली10 / 12पॅट कमिन्स - ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजाने वेस्ट इंडिज आणि भारतापाठोपाठ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी केली.11 / 12मिचेल स्टार्क - वेस्ट इंडिजविरुद्ध त्यानं पाच विकेट घेतल्या होत्या.12 / 12मोहम्मद आमीर - ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त स्पेल टाकून पाकिस्तानच्या या गोलंदाजाने टॉप अकरामध्ये स्थान पटकावले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications