Cricket Buzz»फोटो गॅलरी »वर्ल्ड कप स्पर्धेतील टॉप फाईव्ह फलंदाज, कोण आहे अव्वल?वर्ल्ड कप स्पर्धेतील टॉप फाईव्ह फलंदाज, कोण आहे अव्वल? By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 11:40 AMOpen in App1 / 6इंग्लंडचा मधल्या फळीतील सर्वात भरवशाचा खेळाडू जो रूट हा या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. त्यानं 11 सामन्यांत 556 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावरही दोन शतकं आहेत.2 / 6न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन 578 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं 10 सामन्यांत 9 डावांत ही कामगिरी केली आहे. त्यात दोन शतकांचाही समावेश आहे. विलियम्सनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे.3 / 6बांगलादेशच्या शकीब अल हसनने अष्टपैलू कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं 11 विकेट्स घेतल्या शिवाय 8 सामन्यांत 606 धावाही केल्या. अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. त्याच्या या खेळीत दोन शतकं आहेत.4 / 6ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला एका धावेनं दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानं 10 सामन्यांत 647 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकांचा समावेश आहे.5 / 6भारताच्या रोहित शर्मानं अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानं 9 सामन्यांत 648 धावा चोपल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे. एका वर्ल्ड कप स्पर्धेत पाच शतक करणारा तो पहिलाच खेळाडू आहे.6 / 6 आणखी वाचा Subscribe to Notifications