भारत आणि इंग्लंड या प्रबळ दावेदारांमध्ये रविवारी महामुकाबला होणार आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या, तर इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय संघाला एक विजय पुरेसा आहे, तर इंग्लंडला सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे हा सामना इंग्लंडसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत-इंग्लंड यांच्यांत आतापर्यंत 99 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने 53, तर इंग्लंडने 41 सामने जिंकले आहेत. उभय संघात दोन सामने बरोबरीत सुटले, तर तीन सामने अनिर्णीत राहीले. वर्ल्ड कप स्पर्धेत ते संघ सातवेळा समोरासमोर आले आणि त्यात दोघांनी प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत. यापैकी इंग्लंडमध्ये खेळलेल्या तीन पैकी दोन लढती भारताने जिंकल्या आहेत.