Cricket Buzz»फोटो गॅलरी »ICC World Cup 2019 : न्यूझीलंडचा संघ विश्वचषकात का हरला, जाणून घ्या कारणंICC World Cup 2019 : न्यूझीलंडचा संघ विश्वचषकात का हरला, जाणून घ्या कारणं By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 5:42 PMOpen in App1 / 6सामन्याच्या अखेरच्या षटकात बेन स्टोक्स दुसरी धाव घेत होता. त्यावेळी न्यूझीलंडच्या खेळाडूने यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू फेकला. त्यावेळी धावत असलेल्या स्टोक्सची बॅट त्या चेंडूला लागला आणि त्यांना चार धावा अतिरीक्त मिळाल्या.2 / 6बेन स्टोक्सच्या झेल ट्रेंट बोल्टने सीमारेशेवर पकडला. पण हा झेल पकडल्यावर त्याचा पाय सीमारेषएला लागला. त्यामुळे हा षटकार देण्यात आला. जर स्टोक्सचा झेल यावेळी यशस्वीरीत्या पकडला गेला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.3 / 6न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने सुपर ओव्हर ट्रेंट बोल्टला दिली आणि हा निर्णय चांगलाच महागात पडला. या सामन्यातील शंभरावे षटक बोल्टने टाकले होते. या षटकात बोल्टला भेदक मारा करता आला नाही, त्यामुळेच सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. त्यानंतरही बोल्टला सुपर ओव्हर देण्याची चूक केनने केली.4 / 6अखेरच्या षटकांमध्ये न्यूझीलंडला मोठे फटके मारता आले नाहीत. त्यामुळे त्यांना 241 धावांवर समाधान मानावे लागले.5 / 6मधल्या षटकांमध्ये न्यूझीलंडला इंग्लंडच्या धावा रोखणे जमले नाही. त्याचबरोबर या षटकांमध्ये त्यांना इंग्लंडच्या विकेट्स पटकावणेही जमले नाही. त्यामुळेच बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी शतकी भागीदारी रचली.6 / 6या सामन्यात दोन पंचांचे निर्णय न्यूझीलंडच्या विरोधात गेले. रॉस टेलर नाबाद असताना त्याला पंचांनी बाद ठरवले. त्याचबरोबर जेसन रॉय पायचीत असतानाही त्याला नाबाद ठरवले गेले. आणखी वाचा Subscribe to Notifications