ICC World Cup 2019 : सलग चार सामन्यात तीन बळी; जोफ्रा आर्चर केवळ चौथा!

ललित झांबरे - इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर हा यंदाची विश्वचषक स्पर्धा आपल्या वेगवान आणि प्रभावी माºयाने गाजवतोय. विश्वचषकातील आपल्या सहा पैकी पाच सामन्यात त्याने किमान तीन विकेट काढल्या आहेत. यापैकी चार सामने सलग आहेत.

विश्वचषक स्पर्धेत सलग चार सामन्यात किमान तीन विकेट काढणारा तो केवळ चौथा गोलंदाज असून २००७ नंतर विश्वचषक स्पर्धेत प्रथमच एखाद्या गोलंदाजाने असे यश मिळवले आहे. जोफ्रा आर्चरच्या आधी ब्रेट ली (२००३), चमिंडा वास (२००३) आणि ग्लेन मॅकग्रा यांनी सलग चार विश्वचषक सामन्यात किमान ३ बळी मिळवले होते.

जोफ्रा आर्चरने २०१९ श्रीलंकेविरुद्ध ३/५२, अफगणिस्तानविरुद्ध ३/५२, वेस्ट इंडिजविरुद्ध ३/३० आणि बांगलादेशविरुद्ध ३/२९ अशी कामगिरी केली आहे.

ग्लेन मॅकग्राने २००७ मध्ये वेस्ट इंडिज ३/३१, बांगलादेश ३/१६, इंग्लंड ३/६२ आणि आयर्लंड ३/१७ यांना धक्के दिले.

चमिंडा वासने २००३ मध्ये अशी कामगिरी केली आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध ६/२५, कॅनडाविरुद्ध ३/१५, केनियाविरुद्ध ३/४१ आणि वेस्ट इंडियाविरुद्ध ४/२२ अशी कामगिरी केली आहे.

ब्रेट लीने २००३ मध्येच श्रीलंका ( ३/ ५२) , न्यूझीलंड (५/४२), केनिया ( ३/१४) आणि श्रीलंका ( उपांत्य सामना, ३/३५) यांना धक्के दिले आहेत.