Join us  

ICC World Cup 2019 : 27 वर्षांपूर्वीच टीम इंडियाची जर्सी झाली असती भगवी, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 9:48 AM

Open in App
1 / 7

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित असलेली टीम इंडिया आज यजमान इंग्लंडशी दोन हात करणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं विजयाची मालिका सुरूच ठेवून जेतेपदावरील दावा आणखी पक्का करावा, असं भारतीयांना नक्कीच वाटतंय. पण, हा सामना वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरलाय. ते कारण आहे, भारतीय संघाच्या जर्सीचा बदललेला रंग.

2 / 7

'मेन इन ब्लू' म्हणून ओळखली जाणारी टीम इंडिया रविवारी मैदानावर उतरेल ती ऑरेंज जर्सीमध्ये. बीसीसीआयनं कालच या जर्सीचं अनावरण केलं आणि संघातील शिलेदारांचे फोटोही समोर आले. या जर्सीत आपले सगळे वीर खुलूनच दिसताहेत, पण राजकीय मैदानावर या रंगाने थोडा बेरंग केला आहे. भाजपाचं भगव्या रंगाशी असलेलं नातं पाहून काही विरोधकांना भगव्या रंगाची जर्सी खटकली आहे. परंतु, या भगव्या रंगाचा भाजपा किंवा अन्य कुठल्याही संघटनेशी-पक्षाशी काही संबंध नसल्याचं आयसीसीमधील एका सूत्रानं एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीतून स्पष्ट झालं आहे.

3 / 7

पण, 27 वर्षांपूर्वीच भारतीय संघाला भगवी जर्सी मिळाली असती, परंतु असं काहीतरी घडलं की त्यानंतर भारतीय संघाला निळ्या रंगाची जर्सी घालावी लागली.

4 / 7

1992मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच रंगीत जर्सी घालण्यात आली. सर्व संघांनी आपापल्या राष्ट्रीय ध्वजाचा विचार करून जर्सीचा रंग ठरवला. भारतीय संघ व्यवस्थापकांच्या डोक्यातही हीच कल्पना होती. पण, त्यांना तसे करता आले नाही.

5 / 7

भारताचा शेजारी पाकिस्तानने वर्ल्ड कपसाठी हिरव्या रंगाची जर्सी निवडली, त्यामुळे भारताने या रंगासाठी फार रूची दाखवली नाही. शिवाय भगवा रंग हा देशातील विविध राजकिय पक्षांचा रंग असल्यामुळे त्या वादात न पडण्याचाच निर्णय तत्कालीन संघ व्यवस्थपकांनी घेतला. पांढरा रंग कसोटीत वापरण्यात येत होताच, त्यामुळे निळ्या रंगाचा विचार झाला आणि त्यानंतर भारतीय संघ मेन इन ब्लू म्हणून ओळखला जाऊ लागला.

6 / 7

'टीम इंडियाची नवी जर्सी अमेरिकेतील डिझायनर्सनी तयार केली आहे. हे डिझाइन करताना, चाहत्यांना अगदीच वेगळं, अनोळखी वाटू नये, असा विचार झाला. टीम इंडियाच्या जुन्या टी-२० जर्सीमध्ये ऑरेंज पट्ट्या आहेत. सध्याच्या जर्सीची कॉलर आणि त्यावरचं 'इंडिया' हे नावही ऑरेंज रंगात आहे. त्यामुळे या रंगसंगतीत थोडी अदलाबदल करून डिझाइन्स केली गेली. ती बीसीसीआयला पाठवण्यात आली आणि त्यांनी सर्वोत्तम डिझाइन निवडलं', असं आयसीसीतील सूत्राने एएनआयला सांगितलं.

7 / 7

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतइंग्लंड