Join us  

ICC World Test Championship नं साऱ्यांनाच केलं मालामाल; जाणून घ्या प्रत्येक संघाला मिळाली किती बक्षीस रक्कम!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 1:02 PM

Open in App
1 / 9

बांगलादेश संघाला WTCच्या गुणतालिकेत ९व्या स्थानावर समाधान मानावे लागले. बांगलादेशच्या काही मालिका कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बांगलादेशला ७ सामने खेळता आले आणि त्यात सहा पराभव व १ अनिर्णित सामना असा निकाल लागला. त्यांना २० गुणच मिळाले आणि बीसीसीआयकडून त्यांना ७४ लाखांचं बक्षीस मिळालं.

2 / 9

वेस्ट इंडिजनं १३ सामन्यांत ३ विजय मिळवले, तर त्यांना ८ सामन्यांत पराभव पत्करावा लागला अन् २ सामने अनिर्णीत राहिले. त्यांनी १९४ गुणांची कमाई केली. आयसीसीनं त्यांनाही ७४ लाखांचं बक्षीस दिलं.

3 / 9

श्रीलंकेनं १२ पैकी २ सामन्यांत विजय मिळवला. ६ पराभव व ४ सामने अनिर्णीत राहिले. २०० गुण मिळवणाऱ्या श्रीलंकेलाही ७४ लाखांचे बक्षीस मिळाले.

4 / 9

पाकिस्ताननं २८६ गुणांची कमाई करताना १२ सामन्यांत ४ विजय मिळवले. त्यांना ५ पराभव पत्करावे लागले, तर ३ सामने अनिर्णीत राहिले. पाकिस्तानलाही ७४ लाखांचे बक्षीस मिळाले.

5 / 9

भारताविरुद्धचा पराभव इंग्लंडला फायनलपासून दूर घेऊन गेला. इंग्लंडला २१ पैकी ११ सामन्यांत विजय मिळवून ४४२ गुणांची कमाई करता आली. त्यांना ७ पराभव पत्करावे लागले आणि ३ सामन्यांचा निकाल अनिर्णीत लागला. त्यांना २.६ कोटींचं बक्षीस मिळालं.

6 / 9

दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत २६४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी १३ पैकी ५ सामने जिंकेल, तर ८ मध्ये त्यांना हार मानावी लागली. त्यांना १.४५ कोटींचे बक्षीस मिळाले.

7 / 9

ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला अन् त्यांचेही अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न अपूरे राहिले. १४ सामन्यांत ८ विजय, ४ पराभव व २ अनिर्णीत निकाल, अशी त्यांची कामगिरी. ३३२ गुणांची कमाई करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ३.३ कोटींचे बक्षीस मिळाले.

8 / 9

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या टीम इंडियाला ५.९ कोटी रक्कम मिळाली. १७ सामन्यांत त्यांनी १२ विजय मिळवले, ४ पराभव व १ अनिर्णित निकाल लागले. ५२० गुणांसह टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे.

9 / 9

न्यूझीलंडच्या संघानं जेतेपद पटकावून ११.८ कोटी रुपयाचं बक्षीसही नावावर केले. त्यांनी ११ सामन्यांपैकी ७ विजय मिळवले व ४ सामने पराभूत झाले. त्यांच्या खात्यात ४२० गुण आहेत.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंडइंग्लंडआॅस्ट्रेलियापाकिस्तानद. आफ्रिकावेस्ट इंडिजबांगलादेशश्रीलंका