Join us  

ICC WTC Standing : टीम इंडियानं लॉर्ड्सवर इंग्लंडला लोळवले अन् दुसरीकडे वेस्ट इंडिजला हादरे बसले, पाहा नेमके काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:30 AM

Open in App
1 / 8

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या २७२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १२० धावांवर गडगडला.

2 / 8

भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना लोकेश राहुलच्या १२९, रोहित शर्माच्या ८३, विराट कोहलीच्या ४२, रवींद्र जडेजाच्या ४० व रिषभ पंतच्या ३८ धावांच्या जोरावर ३६४ धावा केल्या.

3 / 8

प्रत्युत्तरात इंग्लंडनं जो रूटच्या नाबाद १८०, जॉनी बेअरस्टो ५७ आणि रोरी बर्न्स ४९ यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ३९१ धावा करून २७ धावांची आघाडी घेतली. मोहम्मद सिराजनं ४, इशांत शर्मानं ३ आणि मोहम्मद शमीनं २ विकेट्स घेतल्या.

4 / 8

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. अजिंक्य रहाणे ( ६१) व चेतेश्वर पुजारा ( ४५) यांनी विक्रमी १०० धावांची भागीदारी करून टीम इंडियाला सावरले.

5 / 8

त्यानंतर पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह ( ३४*) व मोहम्मद शमी ( ५६*) यांनी नाबाद ८९ धावांची भागीदारी करून संघाला मोठा पल्ला गाठून दिला. भारतानं ८ बाद २९८ धावांवर डाव घोषित करून इंग्लंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले.

6 / 8

प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १२० धावांवर गडगडला. जो रूटनं ३३ धावा केल्या. मोहम्मद सिराजनं पुन्हा ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनं या सामन्यात १२६ धावा देताना ८ विकेट्स घेतल्या. त्यानं कपिल देव यांचा ८ बाद १६८ धावांचा विक्रम मोडला. आर पी सिंगनं ११७ धावा देत ७ विकेट्स घेतल्या होत्या.

7 / 8

जसप्रीतनं तीन, इशांत शर्मानं दोन आणि शमीनं एक विकेट घेतली. पण, सामन्यानंतर मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार लोकेश राहुलला देण्यात आला. या विजयानंतर टीम इंडियानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर झेप घेतली.

8 / 8

: वेस्ट इंडिज संघान आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. त्यांनी किंग्स्टन कसोटीत पाकिस्तानवर १ विकेट राखून थरारक विजय मिळवून १२ गुणांची कमाई केली होती.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध इंग्लंडभारतइंग्लंडवेस्ट इंडिज
Open in App