Cricket Buzz»फोटो गॅलरी »ICC World Test Championship : इंग्लंडचा पत्ता कट झाला, पण टीम इंडियाचं Final चं तिकीट अजूनही पक्क नाही!ICC World Test Championship : इंग्लंडचा पत्ता कट झाला, पण टीम इंडियाचं Final चं तिकीट अजूनही पक्क नाही! By स्वदेश घाणेकर | Published: February 25, 2021 8:43 PMOpen in App1 / 8ICC World Test Championship : भारतानं तिसऱ्या कसोटीत अवघ्या दोन दिवसांत पाहुण्या इंग्लंडला पाणी पाजलं. इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियानं ४९ धावांचे माफक लक्ष्य एकही विकेट न गमावता पार केलं. 2 / 8पहिल्या दिवशी १३ आणि दुसऱ्या दिवशी १७ विकेट्स पडल्या. या विजयासह भारतानं मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात अक्षर पटेलनं ( Axar Patel) सामन्यात ११, तर आर अश्विननं ( R Ashwin) ७ विकेट्स घेतल्या. 3 / 8या विजयासह कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) विक्रम मोडला. विराट हा घरच्या मैदानावर सर्वाधिक २२ कसोटी जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला. विराटनं २९ कसोटींपैकी २२ सामने जिंकून धोनीचा २१ कसोटी विजयाचा विक्रम मोडला. 4 / 8या पराभवानंतर इंग्लंडचा ICC World Test Championship ( जागतिक कसोटी अजिंक्यपद ) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या स्वप्नांना सुरूंग लागला. आता जेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंडचा मुकाबला करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ शर्यतीत आहेत.5 / 8भारतानं अहमदाबाद कसोटी ( Ahmedabad Test) जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात ४९० गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. भारताच्या विजयाची टक्केवारी ७१% अशी झाली आहे. इंग्लंड ६४.१ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर राहिला आहे.6 / 8भारतानं जरी हा विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दिशेनं पाऊल पुढे टाकलं आहे. पण, अजूनही चौथ्या कसोटीच्या निकालावर बरंच काही अवलंबून आहे.7 / 8भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील स्थान पक्कं करण्यासाठी चौथ्या कसोटीत विजय मिळवावा लागेल किंवा ती ड्रॉ करावी लागेल. पण, जर इंग्लंडनं हा सामना जिंकला, तर ऑस्ट्रेलियाचे अंतिम सामन्यातील स्थान पक्कं होईल. 8 / 8भारताला ICC World Test Championship च्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ३-१, २-१ असा निकाल हवा आहे, तर या मालिकेचा निकाल २-२ असा बरोबरीत लागल्यास ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल. आणखी वाचा Subscribe to Notifications