Join us  

ICC WTC Final: न्यूझीलंडच्या संघाचा टीम इंडियाला धोक्याचा इशारा; रॉस टेलरनं मोडला विराट कोहलीचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 12:13 PM

Open in App
1 / 9

ICC WTC Final: भारतीय संघ खेळाडूंची दोन गटांत विभागणी करून सराव सामना खेळत आहे आणि त्यातूनच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची तयारी करत आहे. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध हा अंतिम सामना रंगणार आहे. त्यासाठी न्यूझीलंडचा संघ भारताच्या आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाला आणि यजमानांसोबत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळला.

2 / 9

केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली किवींनी पहिली कसोटी अनिर्णीत राखली होती. दुसऱ्या कसोटीपूर्वी विलियम्सनसह तीन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत इंग्लंड बाजी मारेल असे वाटले, परंतु किवीच्या दुसऱ्या फळीनं कमाल केली आहे. इंग्लंडला त्यांनी पराभवाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे आणि टीम इंडियासाठी हा धोक्याचा इशारा आहे.

3 / 9

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी रॉस टेलरचा फॉर्म परतणे ही किवींसाठी खूप मोठी गोष्ट आहे. संघातील सर्वात अनुभवी फलंदाज रॉसनं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रॉसनं 80 धावांची खेळी केली आणि त्याजोरवर किवींनी 388 धावा उभ्या केल्या. या खेळीदरम्यान रॉसनं कसोटी क्रिकेटमध्ये 7500 धावांचा पल्ला पार केला आणि त्यानं वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर डेसमंड हेंस व भारताचा कर्णधार विराट कोहली यांना मागे टाकले.

4 / 9

रॉसनं 107 कसोटी सामन्यांत 45.76 च्या सरासरीनं 7506 धावा केल्या आहेत. 290 ही त्याची सर्वोत्तम भागीदारी आहे. किवी फलंदाजानं 19 शतकं व 35 अर्धशतकं झळकावली आहेत. विराट कोहलीनं 91 कसोटींत 52.37च्या सरासरीनं 7490 धावा केल्या आहेत.

5 / 9

रॉसनं मागील 16 कसोटी डावांत फक्त दोन अर्धशतकं झळकावली होती. पण, त्याचा फॉर्म परतल्यानं किवी संघाचे मनोबल उंचावले आहे. किवीच्या सध्याच्या संघातील भारताविरुद्ध सर्वाधिक 812 धावांचा विक्रमही रॉसच्या नावावर आहे. यात 3 शतकं व 1 अर्धशतकाचा समावेश आहे. रॉसनं 2012मध्ये भारताविरुद्ध शेवटचं कसोटी शतक झळकावलं होतं.

6 / 9

न्यूझीलंडचा संघ दुसरा कसोटी सामनाही जिंकणार आहे. पहिली कसोटी अनिर्णीत राहिली होती. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडनं पहिल्या डावात 303 धावा केल्या, प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं 388 धावा केल्या. पण, दुसऱ्या डावात इंग्लंडची अवस्था 9 बाद 122 अशी झाली आहे.

7 / 9

तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने 37 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडे 22 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. याआधी 1999मध्ये स्टीफन फ्लेमिंग याच्या नेतृत्वाखाली किवींनी 2-1 अशा फरकानं कसोटी मालिका जिंकली होती.

8 / 9

सात वर्षांनंतर इंग्लंडवर घरच्याच मैदानावर कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली आहे.

9 / 9

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धान्यूझीलंडइंग्लंड