Join us  

... तर Virat Kohli, MS Dhoni यांच्यासह अनेकांना कोट्यवधींचा भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 11:24 AM

Open in App
1 / 12

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) १३ वा मोसम १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. सध्यपरिस्थिती पाहता १५ एप्रिललाही आयपीएल सुरू होण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआयच्या बैठकीत ही स्पर्धा जुलै-सप्टेंबर या कालावधीत घ्यावी का, यावरही चर्चा सुरू आहे.

2 / 12

आयपीएल न झाल्यास बीसीसीआय, फ्रँचायझी मालक, ब्रॉडकास्टर आणि अन्य भागदारक यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. हा आकडा जवळपास १००० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर खेळाडूंनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल.

3 / 12

टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीला आयपीएल स्पर्धा न झाल्यास १७ कोटींचा फटका बसू शकतो.

4 / 12

२०१८च्या लिलावात RCBनं त्याला संघात कायम राखण्यासाठी २ कोटी अधिक रक्कम मोजली आणि दोन वर्ष तो आयपीएल संघाकडून १७ कोटी घेत आहे.

5 / 12

ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सला आयपीएल २०२०च्या लिलावात सर्वाधिक १५.५ कोटींची बोली लागली. कोलकाता नाइट रायडर्सने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करण्यासाठी तगडी रक्कम मोजली.

6 / 12

पण, आयपीएलच झाली नाही, तर त्याला या रकमेवर पाणी फिरवावे लागेल. जरी आयपीएल खेळवण्यात आली, तरी ऑस्ट्रेलियन सरकारने पदरेश दौऱ्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे कमिन्सचे आर्थिक नुकसान होणार हे निश्चित आहे.

7 / 12

महेंद्रसिंग धोनीला टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी आयपीएल होणे महत्त्वाचे आहे. पण, तसे न झाल्यास चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधाराचा टीम इंडियात पुमरागमनाचा मार्ग खडतर बनेल.

8 / 12

शिवाय त्याला १५ कोटींचा आर्थिक फटकाही बसेल. तो २००८ पासून चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य आहे.

9 / 12

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मालाही २०१८च्या लिलावात संघाने १५ कोटी रक्कम देऊन कायम राखले. इतरांप्रमाणे रोहितलाही कोट्यवधी रकमेवर पाणी फिरवावे लागेल.

10 / 12

२०११ पासून रोहित मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चार जेतेपदं नावावर केली आहेत.

11 / 12

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याच्यासाठी २०१९वर्ष संस्मरणीय राहिले. २०१८च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला १२.५ कोटींत आपल्या चमूत घेतले.

12 / 12

आयपीएल न झाल्यास त्यालाही आर्थिक फटका बसेल.

टॅग्स :आयपीएल 2020कोरोना वायरस बातम्यामहेंद्रसिंग धोनीविराट कोहलीबेन स्टोक्सरोहित शर्मा