सध्या AI चा ट्रेंड आहे. या ट्रेंडमध्ये बरेच जण राजकीय नेत्यांचेही फोटो बनवत असतात. एका इन्स्टाग्राम युजरने भारतातील दिग्गज राजकीय नेत्यांना विविध IPL टीमच्या जर्सीमध्ये दाखवण्यात आले आहे. जे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
या AI फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात टाइटंसची टीमची जर्सी घालून दाखवलं आहे. कारण नरेंद्र मोदी हे गुजरात राज्यातून येतात आणि तिथे ते मुख्यमंत्री राहिले होते.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना AI आर्टिस्टेटने IPL च्या दिल्ली कॅपिटल्सची कमान सोपवली आहे. फोटो DC टीमची जर्सी घालून केजरीवालांच्या हातात बॅट देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही IPL टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांना लखनौ सुपर जायंट म्हणजे LSG ची जर्सी घातलेली दाखवण्यात आली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना AI यूजरने पंजाब किंग्स टीमची जर्सी घातलेली दाखवली आहे. भगवंत सिंग मान हे या फोटोत बॉलिंग प्रॅक्टिस करताना दाखवण्यात आलं आहे.
व्हायरल AI फोटोत ममता बॅनर्जी यांचाही फोटो आहे. त्यात त्या केकेआर म्हणजे कोलकाता नाइट राइटर्सच्या जर्सीत नजरेस पडतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हाती बॅट दाखवण्यात आली आहे.
राज्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील AI फोटोत आयपीएलमधील टीम सांभाळतायेत. मुंबई इंडियन्सची कमान शिंदे यांच्या हाती देण्यात आली आहे. ते हातात बॉल घेऊन विकेटची प्रॅक्टिस करताना दिसतात.
AI आर्टिस्टने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना रॉयल चॅलेंज बंगळुरू टीमची जर्सी घातलेले दाखवले आहे. RCB जर्सी घालून राहूल गांधी दोन्ही हातात कप उचलताना दाखवले आहेत. विशेष म्हणजे RCB नं आजपर्यंत एकही कप जिंकला नाही.
भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनाही AI आर्टिस्टनं आयपीएल टीममध्ये घेतले आहे. अमित शाह राजस्थान रॉयल्समधून बँटिंग करताना दिसून येत आहेत.
तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचाही आयपीएल टीममध्ये समावेश आहे. त्यांच्याकडे सनराइजर्स हैदराबादची कमान देण्यात आली आहे.
या व्हायरल AI फोटोत आर्टिस्टनं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत दाखवले आहे. चेन्नई तामिळनाडूची राजधानी असून स्टॅलिन यांना CSK चं कॅप्टन बनवलं आहे.