Join us  

रवींद्र जडेजाला रिलीज करून १६ कोटी सहज कमावता आले असते; भारतीय गोलंदाजाचा CSKला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 4:16 PM

Open in App
1 / 8

टी-२० विश्वचषकाचा थरार संपल्यानंतर जगातील सर्वात मोठी टी-२० लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीगने (IPL) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करायला सुरूवात केली आहे. मंगळवारी आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये चेन्नईच्या फ्रँचायझीने अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो याला संघातून बाहेर केले आहे.

2 / 8

खरं तर सीएसकेच्या पर्समध्ये आता २०.४५ कोटी रक्कम शिल्लक असून विदेशी खेळाडूंच्या २ जागा रिक्त आहेत. लक्षणीय बाब म्हणजे सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीकडे सर्वाधिक ४२ कोटींची रक्कम शिल्लक आहे. कारण हैदराबादच्या फ्रँचायझीने १२ खेळाडूंना रिलीज केले आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने अष्टपैलू रवींद्र जडेजाला आपल्या संघात कायम ठेवले आहे.

3 / 8

चेन्नईच्या फ्रँचायझीने अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, ॲडम मिल्न्, हरी निशांथ, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसीफ आणि नारायण जगदीसन या खेळाडूंना रिलीज केले आहे. त्यामुळे आगामी २३ डिंसेबर रोजी होणाऱ्या लिलावात सीएसकेच्या फ्रँचायझीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

4 / 8

अशातच भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने सीएसकेच्या संघाला एक सल्ला दिला आहे. त्याने म्हटले की, चेन्नईच्या फ्रँचायझीने डावखुऱ्या रवींद्र जडेजाला संघाबाहेर न करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. मात्र जडेजाला सीएसकेने रिलीज केले असते तर फ्रँचायझीला १६ कोटी रूपये मिळाले असते. परंतु त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे त्याच्यासाठी पर्याय शोधणे देखील अशक्य झाले असते, असा दावा देखील अश्विनने केला.

5 / 8

अश्विनने चेन्नईच्या फ्रँचायझीचे कौतुक करताना म्हटले, 'सीएसकेच्या फ्रँचायझीने जडेजाला रिलीज केले असते तर कदाचित १६ कोटी मिळाले असते. पण त्याच्यासारखा भारतीय खेळाडू कुठे मिळणार? दुसरे, जर तुम्ही त्याचा दुसऱ्या संघाशी व्यवहार केला तर तो त्या संघात किती मजबूत राहिल? तो नक्कीच अस्वस्थ असेल. त्यामुळे मला विश्वास आहे की अधिक चांगला निर्णय घेण्यात आला आहे.'

6 / 8

खरं तर आगामी आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार जडेजा होईल अशी चर्चा होती. रवींद्र जडेजाने आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. मात्र आगामी हंगामात देखील संघाचा नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघाची धुरा सांभाळणार आहे.

7 / 8

अश्विनने अधिक म्हटले की, 'रॉबिन उथप्पाने निवृत्ती जाहीर केल्यानंतर मनीष पांडे सीएसकेच्या नजरेत असू शकतो. कारण ते भारतीय फलंदाज शोधत आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ पांडेसाठी बोली लावण्याबाबत विचार करेल असा माझा अंदाज होता.' मागील वर्षी मनीष पांडे लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा हिस्सा होता. मात्र त्याला फ्रँचायझीने आगामी हंगामासाठी रिलीज केले आहे.

8 / 8

आगामी आयपीएल २०२३चा मिनी-लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रँचायझीकडे सध्या २०.४५ कोटी रूपये शिल्लक आहेत. त्यामुळे सीएसकेची फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार हे पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :आयपीएल लिलावआर अश्विनमहेंद्रसिंग धोनीरवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्स
Open in App