Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPLमध्ये 'अशी' टीम असेल, तर समोर कुणी टिकूच शकणार नाही!IPLमध्ये 'अशी' टीम असेल, तर समोर कुणी टिकूच शकणार नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 3:33 PMOpen in App1 / 11शेन वॉटसन : चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना शेन वॉटसन या अष्टपैलू खेळाडूने दोन शतके झळकावली. या हंगामातील 15 सामन्यांमध्ये त्याने 555 धावा आणि 6 बळी मिळवले.2 / 11केन विल्यम्सन : सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार आणि फलंदाजीचा आधारस्तंभ होता तो केन विल्यम्सन. यंदाच्या आयपीएलमध्ये ' ऑरेंज कॅप ' विल्यम्सनने पटकावली होती. विल्यम्सनने 17 सामन्यांमध्ये 142.44च्या सरासरीने 735 धावा केल्या होत्या.3 / 11लोकेश राहुल : किंग्ज इलेव्हनचा सलामीवीर असलेल्या लोकेश राहुलने यंदाच्या मोसमात जबरदस्त फलंदाजी केली. राहुलने 14 सामन्यांमध्ये 158.41च्या स्ट्राइक रेटने 659 धावांचा समावेश होता.4 / 11महेंद्रसिंग धोनी : चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी कर्णधार, यष्टीरक्षक आणि फलंदाज अशी तिहेरी भूमिका यशस्वीरीत्या पार पाडली ती महेंद्रसिंग धोनीने. चेन्नईकडून 16 सामने खेळताना धोनीने 150.66च्या सरासरीने 455 धावा केल्या होत्या. यंदाच्या आयपीएलमधला सर्वात यशस्वी कर्णधार धोनीच ठरला आहे.5 / 11रिषभ पंत : दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून रिषभ पंतचे नाव घेता येईल. यंदाच्या मोसमात पंतने 14 सामन्यांमध्ये एका शतकासह 684 धावा केल्या, त्याचबरोबर 162.71च्या सरासरीने फलंदाजी करताना पाच अर्धशतकेही लगावली.6 / 11सुनील नरिन : कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वात महत्वाचा खेळाडू ठरला होता तो सुनील नरिन. कारण भेदक फिरकी गोलंदाजीबरोबर त्याने धडाकेबाज फलंदाजीही केली. कोलकात्याकडून खेळताना 16 सामन्यांमध्ये 189.89च्या सरासरीने नरिनने 357 धावा केल्या, त्याचबरोबर 17 बळीही त्याने मिळवले.7 / 11अंबाती रायुडू : चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला तो अंबाती रायुडू. या हंगामात 16 सामन्यांमध्ये 149.75च्या स्ट्राइक रेटने 602 धावा केल्या, यामध्ये एका शतकासह तीन अर्धशतकांचा समावेश होता.8 / 11आंद्रे रसेल : कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दमदार अष्टपैलू कामगिरी केली होती ती आंद्रे रसेलने. या हंगामात 16 सामने खेळताना रसेलने 184.79च्या स्ट्राइक रेटने 316 धावा केल्या, त्याचबरोबर भेदक गोलंदाजी करत 13 बळीही मिळवले.9 / 11सिद्धार्थ कौल : सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला होता तो सिद्धार्थ कौल. हैदराबादकडून खेळताना कौलने 17 सामन्यांमध्ये 21 बळी मिळवले होते.10 / 11अॅण्ड्रयू टाय : किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघातून खेळताना अचूक मारा करत नाव कमावले ते अॅण्ड्रयू टाय या वेगवान गोलंदाजाने. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळवत ' पर्पल कॅप ' टायने पटकावली होती. टायने 14 सामन्यांमध्ये 24 बळी मिळवण्याची किमया साधली होती.11 / 11रशिद खान : यंदाच्या आयपीएलमध्ये एक फिरकीपटू म्हणून सर्वाधिक नावलौकिक कमावला तो रशिद खानने. सनराझर्स हैदराबादकडून खेळताना रशिदने 17 सामन्यांत 21 बळी मिळवले. आणखी वाचा Subscribe to Notifications