नेट्समध्ये सराव करायला मला भीती वाटते, कोहलीने केला धक्कादायक खुलासा

वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना सुरु होण्यापूर्वी कोहलीने सर विवियन रीचर्ड्स यांची मुलाखत घेतली होती. यामध्ये कोहलीने ही गोष्ट जाहीर केली.

ही मुलाखत घेताना कोहली म्हणाला की, " सुरुवातीला मी नेट्समध्ये सराव करायचो. पण आता काही कारणास्तव मला नेट्समध्ये सराव करणे धोकादायक वाटते."

कोहलीच्या म्हणण्याला रीचर्ड्स यांनीही दुजोरा दिला होता.

कोहली पुढे म्हणाला की, "मैदानातील आणि नेट्समधील परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा नेट्समध्ये सराव करताना तेव्हा तुम्हाला मानसीकता बदलावी लागते."

नेट्सध्ये सराव करण्यापेक्षा मैदानाच्या मोठ्या भागात क्षेत्ररक्षक लावून सामन्यासारखी प्रॅक्टीस करायला हवी, असे कोहलीला वाटते.

गेल्या काही दिवसांपासून कोहली नेट्समध्ये फार कमी काळ सराव करताना दिसतो.