Cricket Buzz»फोटो गॅलरी »रोहितचा एकाच सामन्यातून मोठा 'षटकार', शतकवीर 'हिटमॅन'चे ६ विक्रम; दिग्गजांच्या यादीत एन्ट्रीरोहितचा एकाच सामन्यातून मोठा 'षटकार', शतकवीर 'हिटमॅन'चे ६ विक्रम; दिग्गजांच्या यादीत एन्ट्री By ओमकार संकपाळ | Published: October 11, 2023 9:12 PMOpen in App1 / 10अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपले रौद्ररूप धारण केले. अवघ्या ६३ चेंडूत शतक झळकावून हिटमॅनने सहा मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी करताना रोहितने धावांचा पाऊस पाडला. 2 / 10पाच षटकार आणि सोळा चौकारांच्या मदतीने त्याने ८४ चेंडूत १३१ धावांची अप्रतिम खेळी केली. या शतकासह तो भारताकडून विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे.3 / 10तसेच विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत तो जगातील खेळाडूंमध्ये सहाव्या क्रमांकावर पोहचला. या यादी एडन मार्करम (४९ चेंडू) पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय भारताकडून वन डे मध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा रोहित पाचवा खेळाडू ठरला.4 / 10भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये केवळ ५२ चेंडूत शतक झळकावून किंग कोहलीने या यादीत आपले वर्चस्व राखले आहे. त्यापाठोपाठ वीरेंद्र सेहवागचा (६० चेंडू) नंबर लागतो.5 / 10लक्षणीय बाब म्हणजे विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारा खेळाडू म्हणून रोहितची नोंद झाली आहे. त्याने याबाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. रोहितने सर्वाधिक (७) शतके झळकावली आहेत, तर सचिन तेंडुलकर (६), रिकी पॉन्टिग (५) आणि कुमार संगकाराला (५) शतके झळकावता आली आहेत.6 / 10दरम्यान, वन डेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत रोहितने ऑस्ट्रेलियन दिग्गज पॉन्टिगला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले. या यादीत ४९ शतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे, तर विराट कोहली (४७) आणि रोहित शर्मा (३१) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे.7 / 10सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतकांच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. इथे देखील पहिल्या क्रमांकावर तेंडुलकर (४५ शतके) आहे. रोहितने सलामीवीर म्हणून आतापर्यंत २९ शतके झळकावली आहेत.8 / 10अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यातून हिटमॅन रोहितने सहा मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. सुरूवातीपासून स्फोटक खेळी करणाऱ्या रोहितने सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत आपली दहशत निर्माण केली.9 / 10आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा रोहित पहिला खेळाडू ठरला असून त्याने आतापर्यंत ५५४ षटकार ठोकले आहेत. या यादीत त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलला मागे टाकले.10 / 10सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत गेल (५५३ षटकार) दुसऱ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी ४७६ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications