Cricket Buzz»फोटो गॅलरी »लखनौची सलग दुसऱ्यांदा एलिमिनेटरमध्ये झेप; पराभूत होऊनही मिळणार कोट्यवधींचे बक्षीसलखनौची सलग दुसऱ्यांदा एलिमिनेटरमध्ये झेप; पराभूत होऊनही मिळणार कोट्यवधींचे बक्षीस By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 5:51 PMOpen in App1 / 10लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला सलग दुसऱ्यांदा एलिमिनेटरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आपल्या पदार्पणाच्या हंगामात अर्थात मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौला बाहेरचा रस्ता दाखवला होता.2 / 10यंदा संघाचा नियमित कर्णधार लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत देखील लखनौने एलिमिनेटरपर्यंत मजल मारली. पण मुंबई इंडियन्सने ८१ धावांनी मोठा विजय मिळवत लखनौला चीतपट केले.3 / 10मुंबईचा संघ दुसऱ्या क्वालिफायमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सशी भिडेल. यातील विजयी संघ चेन्नई सुपर किंग्जसोबत २८ मे रोजी फायनलचा सामना खेळेल. 4 / 10शुक्रवारी मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना होणार असून यातील विजयी संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. काल झालेल्या सामन्यात मुंबईने ऐतिहासिक विजय मिळवत लखनौला बाहेरचा रस्ता दाखवला. 5 / 10विशेष बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सने लखनौला पराभूत केले. ८१ धावांनी मोठा विजय मिळवून मुंबईने फायनलकडे कूच केली आहे.6 / 10महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या क्वालिफायमध्ये गुजरातला पराभूत करून फायनलचे तिकिट मिळवले. चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात तब्बल अकरावेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.7 / 10एलिमिनेटरमध्ये पराभूत होणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सला ६ कोटी ५० लाख रूपयांचे बक्षीस मिळणार आहे, तर क्वालिफाय २ मध्ये पराभूत होणाऱ्या संघाला ७ कोटी रूपये मिळतील.8 / 10आयपीएल २०२३ च्या विजेत्या संघाला २० कोटी रूपये मिळतील. याशिवाय उपविजेत्या संघावर १३ कोटी रूपयांचा वर्षाव होईल.9 / 10आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा ऑरेंज कॅप देऊन गौरव केला जातो. ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूस १५ लाखाचे बक्षीस मिळते. 10 / 10तसेच सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देऊन सन्मानित केले जाते. हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाजाला देखील बक्षीस म्हणून १५ लाख रूपये दिले जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications