Join us  

India's FTP from 2023 to early 2027 : World Cup तयारीच्या नावाखाली BCCI पुन्हा टीम इंडियाला दमवणार; पाहा २०२७ पर्यंतचा पॅक शेड्यूल्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 11:20 AM

Open in App
1 / 9

India's FTP from 2023 to early 2027 - ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला लाजीरवाण्या पराभवासह उपांत्य फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. हार्दिक पांड्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने १६९ धावांचे ठेवलेले लक्ष्य इंग्लंडने एकही विकेट न गमावता सहज पार केले.

2 / 9

यूएईत पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळल्यानंतर टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली गेली. त्यानंतर रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने ट्वेंटी-२० मालिकांमध्ये विजयाचा सपाटा लावला आणि वर्ल्ड कप विजयाच्या आशा पल्लवीत केल्या.

3 / 9

वर्ल्ड कपला रवाना होण्यापूर्वी रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह या दोन प्रमुख खेळाडूंनी दुखापतीमुळे माघार घेतली आणि भारताला खूप मोठा धक्का बसला. सततचं क्रिकेट याला जबाबदार असल्याची चर्चा तेव्हा रंगली. जसप्रीत पुर्णपणे तंदुरुस्त नसतानाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला खेळवण्याची घाई महागात पडली.

4 / 9

आता BCCI ने २०२३ चा वन डे व २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे सीनियर्स खेळाडूंना वन डे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे, तर ट्वेंटी-२०साठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना घडवण्याचे काम सुरू झाले आहे.

5 / 9

पण, आधीच्या अनुभवातूनही BCCI काही शिकलेली दिसत नाही, बीसीसीआयने २०२३ ते २०२७ या कालावधी पर्यंतचा टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात सततच्या आंतरराष्ट्रीय मालिका पाहून खेळाडू पुन्हा दमणार असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यात आयपीएल मध्ये असल्याने खेळाडूंची दमछाक निश्चित आहे.

6 / 9

२०२३मध्ये वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. जानेवारी २०२३मध्ये श्रीलंकेचा संघ तीन वन डे व तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड ( ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०), ऑस्ट्रेलिया ( ४ कसोटी व ३ वन डे) भारत दौऱ्यावर येतील. इंग्लंड, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आशिया चषक आहेच, मग ऑस्ट्रेलियाचा पुन्हा भारत दौरा, वर्ल्ड कप असे सतत क्रिकेट आहेच.

7 / 9

२०२४मध्ये जानेवारी-मार्च महिन्यात इंग्लंड ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. त्यानंतर आयपीएल आणि जूनमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप. श्रीलंका दौऱ्यानंतर बांगलादेश, न्यूझीलंडचा भारत दौऱा आणि पुन्हा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

8 / 9

२०२५मध्ये इंग्लंडचा भारत दौरा, चॅम्पियन्स ट्रॉफी ( पाकिस्तान), जागतिक कसोटी अजिंक्यपद, इंग्लंड दौरा, बांगलादेश दौरा, आशिया चषक असे दौरे आहेत. वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धची मालिकाही आहेच.

9 / 9

२०२६-२०१७मध्येही भारताचा व्यग्र वेळापत्रक आहेच.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारत विरुद्ध न्यूझीलंड
Open in App