Cricket Buzz»फोटो गॅलरी »नवं वर्ष नवा कर्णधार? IND vs AFG ट्वेंटी-२० मालिका; ११ तारखेपासून भारतात रंगणार थरारनवं वर्ष नवा कर्णधार? IND vs AFG ट्वेंटी-२० मालिका; ११ तारखेपासून भारतात रंगणार थरार By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 8:36 PMOpen in App1 / 10दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.2 / 10खरं तर आगामी मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त आहेत. तर, रोहित शर्माने मागील ट्वेंटी-२० विश्वचषकापासून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रस दाखवला नाही.3 / 10भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यानंतर रोहितला याबद्दल प्रश्न विचारला असता त्याने उत्तर देणे टाळले. आगामी मालिकेतून मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती मिळण्याची अपेक्षा आहे.4 / 10रिपोर्टनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेतून ट्वेंटी-२० संघात पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. या मालिकेतील सलामीचा सामना मोहाली येथे खेळवला जाईल.5 / 10तर, १४ जानेवारीला इंदूर येथे दुसरा आणि अखेरचा सामना १७ जानेवारीला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.6 / 10भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा ट्वेंटी-२० फॉरमॅटसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. माहितीनुसार, कोहली आणि रोहितने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.7 / 10आगामी मालिकेसाठी निवड समितीची बैठक होत आहे. त्यामुळे आगामी मालिकेत भारतीय संघाची धुरा कोणाच्या खांद्यावर असणार हे पाहण्याजोगे असेल.8 / 10अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात येईल, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. 9 / 10तर, मोहम्मद शमी देखील या मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार नाही. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळेल हे स्पष्ट आहे.10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications