Virat Kohli Shubman Gill: शुबमन गिल ऑस्ट्रेलिया विरूद्ध ठोकणार झंझावाती शतक? 'किंग कोहली' करतोय मदत

९ फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला होणार सुरूवात

Virat Kohli Shubman Gill: सध्या क्रिकेट जगतात शुभमन गिलचे नाव चांगलेच गाजताना दिसत आहे. त्याच्या बॅटमधून एकामागून एक शतके झळकत आहेत. आता ऑस्ट्रेलियाच्या मनातही त्याच्याविषयी भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे.

वन डे मध्ये द्विशतक आणि टी२० मध्ये शतक केल्यानंतर आता कसोटी फॉरमॅटमध्येही गिलचे शतक होणं जवळपास निश्चित झाले असल्याच्या चर्चा आहेत. विराट कोहली यासाठी त्याला मदत करत असल्याच्या चर्चा आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. टीम इंडिया नागपुरात जिथे पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे त्या मालिकेच्या तयारीत व्यस्त आहे.

पहिल्या कसोटी सामन्याच्या सराव सत्राचा फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये गिल आणि कोहली एकत्र दिसत आहेत. एक्स्ट्रा टाईमच्या बातमीनुसार, शुभमन गिल आणि विराट कोहली सराव करताना एकत्र दिसले.

कोहलीने शुभमन गिलला फलंदाजीबाबत अनेक टिप्स दिल्या. आता किंग कोहली स्वतः गिलला टिप्स देत असेल तर शुबमन गिलसारखा युवा आणि फॉर्मात असलेला फलंदाज दमदार कामगिरी करत शतक नक्कीच ठोकू शकतो अशी आशा क्रिकेट जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

गिलच्या फलंदाजीचे कौतुक करणाऱ्या खेळाडूंमध्ये कोहलीचाही समावेश आहे. गिलने नुकतेच टी२० मध्ये शतक झळकावले. तेव्हा कोहलीने या युवा फलंदाजाला सोशल मीडियावर 'स्टार' म्हटले होते. तसेच त्याने याआधीही त्याचे कौतुक केले आहे.