Usman Khawaja: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर म्हणजे 'वाद', भाऊ तुरुंगात, पत्नीने धर्म बदलला; मग थाटला संसार

IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडू उस्मान ख्वाजाचे 2022 या वर्षात शानदार प्रदर्शन राहिले. तो ऑस्ट्रेलियाचा मागील वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. 36 वर्षीय ख्वाजा भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत यजमानांचे टेन्शन वाढवण्याची शक्यता आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून नागपुरातून सुरूवात होत आहे. खरं तर उस्मान ख्वाजा पाकिस्तानी वंशाचा आहे. त्याचा जन्म इस्लामाबाद येथे झाला. जेव्हा तो 4 वर्षांचा होता, तेव्हा त्याचे कुटुंब ऑस्ट्रेलियाला गेले.

ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा तो पाकिस्तानी वंशाचा पहिला क्रिकेटपटू आहे. तो आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळला आहे.

मात्र, उस्मान ख्वाजा त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे देखील चर्चेचा विषय ठरला आहे. 2016 मध्ये त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाला त्याच्या एंगेजमेंटबद्दल सांगितले. 2018 मध्ये त्याने रेचेल मॅक्लेलनशी लग्न केले. रेचलला लग्नाआधी धर्म बदलावा लागला होता. इस्लाम स्विकारल्यानंतरच दोघांचे लग्न होऊ शकले. यानंतर उस्मान ख्वाजाला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

उस्मान ख्वाजा आणि त्याची पत्नी रेचल यांच्यामध्ये 8 वर्षांचा फरक आहे. रेचल ख्वाजापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. रेचलने एका कार्यक्रमात सांगितले होते की, इस्लामबद्दल मनात काही चुकीचा संभ्रम होता, पण क्रिकेटपटूला भेटल्यानंतर तो दूर झाला आहे. त्याचवेळी ख्वाजाने सांगितले की, मी कधीच तिला जबरदस्तीने धर्मांतर करायला सांगितले नव्हते.

उस्मान ख्वाजा 2 मुलांचा बाप आहे. 2011 मध्ये पदार्पण केलेल्या ख्वाजाची कारकिर्द चढउताराची राहिली आहे. कारण तो सातत्याने आंतरराष्ट्रीय संघात खेळू शकला नाही.

उस्मान ख्वाजाचा भाऊ अर्सलान ख्वाजा याला दहशतवादी कट रचून मित्राला फसवल्याप्रकरणी साडेचार वर्षांसाठी तुरुंगात टाकण्यात आले आहे. मैत्रिणीशी जवळीक वाढल्याने तो आपल्या मित्राचा तिरस्कार करू लागला आणि त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला.

उस्मान ख्वाजाच्या कसोटी कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने 56 सामन्यांतील 98 डावांमध्ये 48च्या सरासरीने 4162 धावा केल्या आहेत. ख्वाजाच्या नावावर 13 शतक आणि 19 अर्धशतकांची नोंद आहे. यामध्ये 195 धावांची नाबाद खेळी त्याची सर्वोत्कृष्ट खेळी ठरली आहे.