Join us  

IND vs AUS : आपला Suryakumar Yadav पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानवर भारी पडला; मोठा विक्रम नोंदवला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 3:46 PM

Open in App
1 / 7

India vs Australia 3rd T20I : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्स राखून विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली. रोहित शर्मा व लोकेश राहुल झटपट माघारी परतल्यानंतर विराट कोहली व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी शतकी भागीदारी करून डाव सावरला. सूर्यकुमारला प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला गेला.

2 / 7

कॅमेरून ग्रीनचा ( Cameron Green) तडाखा पाहून ऑस्ट्रेलिया आज धावांचा डोंगर उभा करेल असेच चित्र होते. पण, अक्षर पटेल ( Axar Patel) व युजवेंद्र चहल यांनी भारताला पुनरागमन करून दिले. अखेरच्या काही षटकांत टीम डेव्हिडने ( Tim David) भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले आणि तगडे आव्हान उभे केले.

3 / 7

कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा चोपल्या. टीम डेव्हिड २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. सॅम्स २८ धावांवर नाबाद राहिला. भुवीने ३ षटकांत ३९ ( १ विकेट) धावा, जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या. अक्षरने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलनेही २२ धावांत १ विकेट घेतली.

4 / 7

१८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुल ( १) व रहित शर्मा ( १७ ) माघारी परतले. सूर्यकुमार व विराट यांनी १०४ धावांची भागीदारी करून डाव सावरला. सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून ६९ धावांवर झेलबाद झाला. विराटने ४८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावा करून आपलं काम केलं. हार्दिक १६ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला. भारताने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

5 / 7

भारतीय संघ २८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. ३२ वर्षीय सूर्यकुमार यादने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३१ सामन्यांत २९ डावांत ३७ च्या सरासरीने ९२६ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व ७ अर्धशतकांचा समावेश आहे.

6 / 7

२०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सर्वाधिक ६८२ धावांचा विक्रमही सूर्याने नावावर केला आहे. आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या संघांमध्ये २०२२ साली ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावांचा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर होता. त्याने ५५६ धावा केल्या आहेत. निकोलस पूरन ( ५५३), सिकंदर रझा ( ५१६) व पथूम निसंका ( ४९९) हे त्याच्या मागे आहेत. पण, संलग्न सदस्यांचाही विचार केल्यास नेपाळचा दिपेंद्र सिंग ६२६ व झेक प्रजासत्ताकचा साबावून दाविझी ६१२ धावांसह रिझवानच्याही पुढे आहेत.

7 / 7

BCCI ने अक्षर पटेल व सूर्यकुमार यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यात सूर्यकुमार यादवला सामन्याआधी पोटात दुखत होतं आणि तापही आल्याचे समोर आलं. अक्षरने याबाबत जेव्हा सूर्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, वातावरण बदललं होतं आणि आपण प्रवासही केला होता. मला ताप आला होता आणि पोटातही दुखत होतं. मी पहाटे ३ वाजता डॉक्टर व फिजिओ यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं मला औषध द्या-इंजेक्शन द्या मला आजच्या सामन्यासाठी तयार करा. हिच जर वर्ल्ड कप फायनल असती तर काय झालं असतं? मी आजारपणाचं कारण देऊन बाहेर बसलो नसतो. मला सर्व परिस्थितीसाठी सज्ज राहायचं आहे. मी जेव्हा मैदानावर टीम इंडियाची जर्सी घालून मैदानावर उतरलो, तेव्हा सर्व आजारपण गायब झालं.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार अशोक यादवपाकिस्तान
Open in App